Punjab Kabaddi Player Saam Tv
देश विदेश

Shocking News : कबड्डी खेळताना खेळाडू मैदानात कोसळला अन् मृत्यू झाला , धक्कदायक कारण आलं समोर

Punjab Kabaddi Player : पंजाबमधील कबड्डी सामन्यात तरुण खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. डॉक्टरांनी मृत घोषित केले असून गावात शोककळा पसरली आहे.

Alisha Khedekar

पंजाबमध्ये कबड्डी सामन्यात खेळाडू बिट्टू बलिहालचा मृत्यू

रेड टाकताना खेळाडूला छातीत दुखू लागले आणि तो मैदानावरच कोसळला

डॉक्टरांनी मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असे सांगितले

गावात शोककळा पसरली आहे

पंजाबमधून धक्कदायक बातमी समोर आली आहे. कबड्डी खेळताना एका तरुण खेळाडूचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे म्हटलं जात आहे. या घटनेने खेळाडूंमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर मृत खेळाडूचे नाव बिट्टू बलिहाल असे आहे. तसेच या घटनेनंतर मृत खेळाडूच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील रूपलहेरी पंचायतीने आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेत संगरूर जिल्ह्याजवळील भवानीगड येथील गावात भव्य कबड्डी स्पर्धा भरवण्यात आली होती. दोन गटात चुरशीची लढत चालू होती. या सामन्यादरम्यान बिट्टू बलिहाल समोरील टीम समोर रेड टाकण्यासाठी गेला. या दरम्यान त्याला श्वास घेता आला नाही.

त्याच्या छातीत दुखू लागले आणि तो जागीच कोसळला. त्यानंतर त्याला गावातील नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार या तरुण खेळाडूचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. या घटनेनंतर गावात भीतीदायक वातावरण निर्माण झाले.

सर्व आयोजकांनी आणि गाव परिषदेने तरुण खेळाडूच्या मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर खेळाडूच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावकऱ्यांनी मृत खेळाडूच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान खेळाडूंच्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बुधवारी १२ वाजता शिवसेना-मनसे युतीची घोषणा - राऊतांची माहिती

Navi Mumbai : रुग्णवाहिकेचा चालक जेवणासाठी गेला, वाशी रेल्वे स्थानकात तरुणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?

Orange Peel Homemade Serum : थांबा! संत्र्याची साल फेकू नका, 'असे' तयार करा त्वचा चमकवणारे सीरम

Bathroom Mirror Ideas : बाथरुममध्ये लावा या नवीन स्टाईलचे मिरर, बाथरुम अधिक सुंदर दिसेल

Mumbai Politics: जागा वाटपावरून मनसेत नाराजी, वरिष्ठ नेते राज ठाकरेंच्या भेटीला|VIDEO

SCROLL FOR NEXT