Yogi Adityanath News, loudspeaker controversy News in Marathi
Yogi Adityanath News, loudspeaker controversy News in Marathi Saam TV
देश विदेश

योगींचे मिशन भोंगे; उत्तर प्रदेशातील १० हजारांपेक्षा जास्त भोंगे उतरवले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लखनऊ : मशिदीमधील अजान असो की मंदिरांमधील आरती यासाठी सर्रास लाऊडस्पीकर (Loudspeaker) म्हणजे भोंगे वापरले जातात. भोंग्यामुळे अजान आरतीचा आवाज दुरवर जातो. मात्र मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे हटविण्याचा अल्टिमेटम दिल्यामुळे भोंग्याबाबतच राजकारण राज्यातील तापलं आहे. याच पार्श्वभमीवर भोंग्याबाबत राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक देखील आयोजित केली होती. या बैठकी दरम्यान केंद्र सरकारने देशभरातील भोंग्यांबाबत समान नियमावली करावी, निर्णय घ्यावा असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं. (loudspeaker controversy News in Marathi)

मात्र आता उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी भोंगे हटाव मोहीम हातात घेतली आहे. त्यानुसार आता यूपीतील शहरांतील रस्त्यांवरील आणि चौकांमधील लाऊडस्पीकरचा आवाज कमी करून ते खाली उतरवण्याचे प्रशासनाने सुरु केलं असून काल संध्याकाळपर्यंत प्रशासनाने धार्मिक स्थळांवरील जवळपास १०,९२३ लाऊडस्पीकर हटवले तर ३५,२२१ लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्यात आला आहे.

हे देखील पाहा -

मुख्यमंत्री योगी यांच्या सूचनेनुसार मंदिर आणि मस्जिदीवरील भोंगे हटवण्याची कारवाई करण्यात येत आहे. एकट्या वाराणसीमध्ये जवळपास १५०० मंदिरे असून योगींच्या आदेशानंतर काशीच्या विविध मंदिरांमधून लाऊडस्पीकर हटवण्यात आले आहेत. काशीनंतर, गोरखपूरचे गोरखनाथ मंदिर, ज्याचे महंत स्वतः योगी आदित्यनाथ आहेत, येथे लावलेल्या भोंग्यांची संख्या तर कमी झाली आहेच, पण त्यांची दिशाही मंदिराच्या परिसराकडे वळवण्यात आली आहे. दरम्यान, उत्तरप्रदेश सरकारने सर्व जिल्हा प्रशासनाला ३० एप्रिलपर्यंत बेकायदेशीर लाऊडस्पीकरविरोधात मोहीम राबवून सरकारला अहवाल पाठवण्याचे निर्देशही दिले आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Petrol Diesel Price: मुंबईसह पुण्यातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; वाचा आजच्या किंमती

Sleeping Time: दिवसाला किती तास झोप घ्यावी?

Beetroot Dosa Recipe : सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा बीट डोसा; रंग पाहून लहान मुलं देखील ताव मारतील

Lok Sabha Election |अबब! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात 9 हजार कोटींचा मुद्देमाल जप्त!

SCROLL FOR NEXT