उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पारा वाढत चालला आहे. भाजप, सपा, बसपासह सर्वच राजकीय पक्षांनी सत्तेत परतण्यासाठी पूर्ण जोर लावला आहे. भाजपसाठी मुख्यमंत्री, मंत्री आणि अगदी पंतप्रधानही रॅली, पायाभरणी, लोकार्पण कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. या सगळ्यात एक गोष्ट सगळ्यांच्या नजरेत आहे ती म्हणजे शेवटच्या क्षणी राहुलची अनुपस्थिती. राहुल गांधी सध्या वैयक्तिक दौऱ्यावर परदेशात आहेत, तर सोमवारी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीत होते.
योगी आदित्यनाथ यांनी अमेठीतील एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना राहुल गांधींना त्यांच्या 'हिंदू-हिंदुत्वाच्या या वक्तव्यावर टीका केली आहे. त्यांनी आपल्या श्रोत्यांना हिंदू असल्याचा अभिमान बाळगा. आपण भारतीय आहोत आणि हिंदू ही आपली सांस्कृती आहे अभिमानाने सांगा की आम्ही हिंदू आहोत असे देखील ते यावेळी म्हणले.
योगींनी अमेठीतील लोकांमध्ये राहुल गांधींवर तिखट शब्दात टीका केली आहे. योगींनी गांधींच्या हिंदू-हिंदुत्वाच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जे मंदिरात पूजा करायला येत नाहीत ते हिंदू धर्म आणि हिंदुत्वाचे ज्ञान देत आहेत असा टोला लगावला आहे. पुढे योगी म्हणाले की, या लोकांकडे इतके पण संस्कार नही की ते हिन्दू आणि हिंदुत्वाबाबत असा अपप्रचार करण्याची संस्कृती आपली नाही.
अमेठीमध्येच राहुल यांनी हिंदू-हिंदुत्वाचे वक्तव्य केले होते. महात्मा गांधी हे हिंदू होते म्हणून त्यांना महात्मा म्हटले जाते असे ते म्हणाले होते पण नथुराम गोडसेला कधीच महात्मा म्हणता येणार नाही कारण तो खोटे बोलायचे, हिंसाचार पसरवायचे, द्वेष पसरवायचे आणि त्यांनी महात्मा गांधींच्या छातीत तीन गोळ्या झाडल्या. राहुल गांधी सध्या परदेशात आहेत.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.