Winter News Railway Track Shrinking Saam Digital
देश विदेश

Winter News Railway Track Shrinking: राजस्थानमध्ये थंडीचा कहर; चुरूमध्ये रेल्वेरुळही आकुंचन पावले, २ इंचाचा आला गॅप

Rajasthan Winter News: प्रचंड कडाक्याच्या थंडीमुळे राजस्थानमधील दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आहे. हाडे गोठवणाऱ्या थंडीमुळे केवळ माणसंच गारठली नाहीत तर रेल्वे रुळाच्या पट्ट्याही आकुंचन पावल्या आहेत.

Sandeep Gawade

Rajasthan Winter News

प्रचंड कडाक्याच्या थंडीमुळे राजस्थानमधील दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आहे. हाडे गोठवणाऱ्या थंडीमुळे केवळ माणसंच गारठली नाहीत तर रेल्वे रुळाच्या पट्ट्याही आकुंचन पावल्या आहेत. पटऱ्यांमध्ये २ इंचाचा गॅप आला असून अपघाताची शक्यता वाढली आहे. नुकताच चुरू जिल्ह्यातील रतनगडमध्ये रेल्वे ट्रॅक आकुंचन पावून १० मिमीचा गॅप आल्याची घटना समोर आली आहे.

राजस्थान जिल्ह्यातील भौगोलिक स्थितीमुळे येथील हिवाळा आणि उन्हाळा दोन्ही कडाक्याचे असतात. हिवाळ्यात इथलं तापमान ५० अंशांच्या पुढे जातं आणि हिवाळ्यात किमान पातळीच्या खाली तापमान जातं. कधी कधी ते मायनस २ ते ३ अंशांपर्यंत पोहोचतं. सध्या तापमान मायनसमध्ये गेलं नसलं तरी कडाक्याच्या थंडीमुळे नागरिकांचे हाल होतायेत.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रतनगडमधील जीआरपी पोलीस स्टेशनसमोरील मुख्य रेल्वे लाईनमध्ये रेल्वे रुळ लहान झाल्याची माहिती समोर आली आहे. रतनगड जंक्शनवर असलेल्या या मुख्य मार्गावर बहुतांश मालगाड्या धावतात. या गाड्यांचा अधिक भार असतो. अशा परिस्थितीत ट्रेन रुळावरून खाली जाऊन मोठी दुर्घटना घडू शकते. ट्रॅक आकुंचन पावल्याचीबाब गस्ती पथकाला समजल्यानंतर ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच मार्गावरील वाहतून बंद करण्यात आली होती. रेल्वे प्रशासने इतर ट्रॅकची तपासणी आणि दुरुस्तीचं काम हाती घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election: पैसे वाटणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला पकडलं; संतप्त नागरिकांनी मतदान केंद्राबाहेरच चोपलं

Santosh Bangar : संतोष बांगर वादाच्या भोवऱ्यात; निवडणूक अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल, आमदारांनी काय केलं?

भारतात लवकरच लाँच होणार धमाकेदार Realme आणि Redmi चे फोन , फीचर्स आहेत शानदार

मालवणमध्ये एकनाथ शिंदेंनी बॅगेतून काय आणलं? भाजपनंतर शिंदेंवर पैसे वाटपाचे आरोप, VIDEO

Politics : माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकारणातून संन्यास

SCROLL FOR NEXT