Aernard Arnault World Richest Person Saam TV
देश विदेश

World Richest Person : जगातील श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर; एलॉन मस्क यांना मागे टाकत बर्नार्ड अर्नॉल्ट अव्वल स्थानी; नेमकं काय झालं?

Aernard Arnault World Richest Person : लक्झरी ब्रँड LVMH चे मालक बर्नार्ड अर्नॉल्ट ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे. त्यांनी टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांना मागे टाकलं आहे.

प्रविण वाकचौरे

Aernard Arnault News :

जगातील श्रीमंतांच्या यादीत मोठा उलफेर झाला आहे. फोर्ब्सने सध्याच्या अब्जाधीशांची यादी जाहीर केली आहे. लक्झरी ब्रँड LVMH चे मालक बर्नार्ड अर्नॉल्ट ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे. त्यांनी टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांना मागे टाकलं आहे.

फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार ग्लोबल लक्झरी ब्रँड LVMHचे सीईओ अर्नॉल्ट आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती शुक्रवारी 23.6 अब्ज डॉलरने वाढून 207.8 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. तर एलॉन मस्क यांच्याकडे 204.5 अब्ज डॉलर पेक्षा जास्त संपत्ती आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फोर्ब्सच्या अहवालानुसार, 25 जानेवारीला टेस्लाला शेअर बाजारात मोठा झटका बसला आहे. त्यामुळे त्यांची संपत्ती 13 टक्क्यांनी घटली. यानंतर एलॉन मस्कची एकूण संपत्ती 18 अब्ज डॉलर्सनी कमी झाली आहे. दुसरीकडे, LVMH चे शेअर 13 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. फोर्ब्सच्या मते, शुक्रवारी LVMH चे मार्केट कॅप 388.8 बिलियन डॉलरवर पोहोचले.  (Latest Marathi News)

जगातील टॉप 10 श्रीमंत

फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार, बर्नार्ड अर्नॉल्ट आणि एलोन मस्क यांच्यानंतर या यादीत अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण संपत्ती 181.30 अब्ज डॉलर्स आहे.

लॅरी एलिसन यांचे नाव चौथ्या स्थानावर आहे. त्यांची एकूण संपत्ती 142.20 अब्ज डॉलर्स आहे. मेटाचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग 139.1 अब्ज संपत्तीसह पाचव्या स्थानावर आहे. यानंतर वॉरन बफेट, लॅरी पेज, बिल गेट्स, सर्जे ब्रिन आणि स्टीव्ह बाल्मर यांचा श्रीमंतांच्या यादीत समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चाकण MIDCत वाहतूक कोंडी का होते? नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा मोर्चा

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

SCROLL FOR NEXT