नवी दिल्ली : राजस्थानच्या कोटा शहरात एका कर्मचाऱ्याने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोटाच्या भीमगंज मंडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. ४० वर्षीय विजयपाल जनकपुरी हे इंद्रा कॉलनीतील रहिवाशी होते. या कर्मचाऱ्याने राहत्या घरीच टोकाचं पाऊल उचललं. या घटनेने कोटा परिसरात खळबळ उडाली आहे.
कर्मचाऱ्याच्या आत्महत्येनंतर त्याच्या घरातून सुसाइट नोट आढळली आहे. या नोटमध्ये कर्मचाऱ्याने शोरुम मालकावर गंभीर आरोप केले आहेत. 'बॉस मला चोर बोलायचा. तो वारंवार चोर म्हणून हाक मारायचा. पोलीस देखील वारंवार पोलीस स्टेशनमध्ये बोलवायचे, असं कर्मचाऱ्याने नोटमध्ये लिहिलं. पोलिसांनी पोस्टमार्टमनंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांकडे सोपवला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
मृत कर्मचाऱ्याची पत्नी कांचन यांनी सांगितलं की, 'विजयपाल मागील १९ वर्षांपासून कोटा येथील इलेक्ट्रॉनिक शोरुममध्ये काम करत होते. या शोरुमच्या गोदामात एक वर्षांपूर्वी चोरी झाली होती. या चोरीच्या घटनेनंतर पतीवर वारंवार आरोप केले जात होते. चोरीच्या घटनेनंतर वारंवार चोर-चोर बोललं जायचं'.
'२२ ऑगस्ट रोजी ते उत्तर प्रदेशला सोडायला आले होते. यानंतर ४ सप्टेंबर रात्री ९ वाजता शेवटचं बोलणं झालं होतं. सासरच्यांशी बोलणं झाल्यावर त्यांनी आत्महत्या केल्याचं कळलं. सकाळी त्यांच्या चादरीजवळ सुसाइट नोट आढळली. या नोटमध्ये त्यांनी बॉसवर गंभीर आरोप केले आहे, असं पत्नीने सांगितलं.
विजयपाल यांनी चिठ्ठीत म्हटलं की, 'मी जीवन संपवल्यानंतर माझ्या कुटुंबीयांना कोणी त्रास देऊ नये. भाऊ माझ्या पत्नीला ऑफिसमधून मदत कशी मिळेल, यासाठी लक्ष देशील. मी एक वर्षांपासून नैराश्यात होतो. मला समजत नव्हतं की, मी काय करू. मी ऑफिसमध्ये मी नवीन रुजू झालो होतो. त्यानंतर २ महिन्यांनी चोरी झाली. मी एकटा संपूर्ण गोदाम सांभाळायचो. मी कधीही चोरी केली नाही'.
'मी १९ वर्षांपासून काम करत आहे. मी एका खिळ्याचीही चोरी केली नाही. मात्र, त्यांनी माझ्यावर चोर असल्याचा आरोप केला. यानंतर पोलिसांनीही मला खूप त्रास दिला. एक वर्षांपासून माझं डोकं खराब केलं. मी माझी नोकरी सोडू शकत नव्हतो. नोकरी सोडली असती तर त्यांनी माझ्यावरच चोरीचे आरोप केले असते', असे त्यांनी पुढे लिहिलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.