Assam Female Private Parts Checking Case Saam TV
देश विदेश

Shocking News : संतापजनक! कपडे उतरवले अन् अंतर्वस्त्रात हात घातला; परीक्षा केंद्रावर विद्यार्थिनीची तपासणी

Satish Daud

परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका विद्यार्थिनीला तपासणीच्या नावाखाली महिला पोलिसाने बंद खोलीत नेले. तिथे तिचे कपडे उतरवले. इतकंच नाही, तर तिच्या अंतर्वस्त्रात देखील हात घातला. हा धक्कादायक प्रकार आसाममध्ये घडला. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीने तक्रार दाखल केली आहे. तिच्या या तक्रारीची खुद्द मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत.

विद्यार्थिनीसोबत घडलेल्या प्रकारामुळे संपूर्ण आसाममधून संताप व्यक्त केला जात आहे. आसाममधील नलबारी येथील एका परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी नलबारी येथे गट-3 पदांच्या भरतीसाठी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी शेकडो विद्यार्थी आले होते.

यावेळी तपासणी करण्याच्या नावाखाली महिला पोलिसांनी विद्यार्थिंनीची झाडझडती घेतली. यावेळी पीडित विद्यार्थिनीने आरोप केला की, "एका महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी तिला तपासाच्या नावाखाली खोलीत नेले. तिथे तिचे कपडे उतरवले. इतकेच नाही तर तिच्या अंतर्वस्त्रात देखील हात घातला".

पीडिता म्हणाली, "जेव्हा महिला पोलीस हे कृत्य करत होती. तेव्हा मला स्वत:ची खूप लाट वाटत होती. मी परीक्षा देण्यासाठी आले का? असा संताप मला होत होता. या घटनेनंतर माझा मेंदू काम करत नव्हता. मला वाटलं मला काय झालंय? माझ्या डोळ्यात अश्रू तरळले. मलाही परीक्षा द्यावीशी वाटली नाही".

"अजूनही मला त्या गलिच्छ प्रकाराची आठवण येत असून महिला पोलिसाचा हात माझ्या अंगावर रेंगाळल्यासारखा वाटत आहे. मी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली असून मला लवकरात लवकर न्याय मिळावा हवा", असं पीडित विद्यार्थिनीने म्हटलं आहे.

दरम्यान, पोलिसांनी पीडितेच्या तक्रार नोंदवून घेतली असून प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. दुसरीकडे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. मी आसामच्या डीजीपीशी बोललो आहे आणि त्यांना त्या घटनेची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. माझ्यासाठी माता-भगिनींचा सन्मान आणि आदर अत्यंत महत्त्वाचा आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होईल, असं मुख्यमंत्र्‍यांनी म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

SCROLL FOR NEXT