Cat
Cat Saam Tv
देश विदेश

या महिलेने मांजरीशी केले लग्न! कारण ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल

वृत्तसंस्था

एका महिलेने नुकतेच तिच्या मांजरीशी लग्न केले आहे, हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही पण, हो! हे खरं आहे. पण यामागचं कारण काय आहे ? असा प्रश्न आपल्याला पडतो. पण जाणून घेऊयात यामागचं कारण- महिलेले लग्न केलेल्या मांजरीचे नाव इंडिया (India) आहे. डेबोरा हॉग असे हे लग्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे. तर, ती लंडनची रहिवासी आहे.

हॉगने तिच्या मांजरीशी (Cat) लग्न केले कारण ती ज्याठिकाणी भाड्याने राहते तिथे तिची मांजरही राहू शकेल! कारण यापूर्वी त्यांच्या सर्व घरमालकांनी तिला प्राणी पाळण्यास नकार दिला होता. यामुळे महिलेने ही युक्ती काढली आणि मांजरीशी लग्न केले.

महिलेने सांगितले की तिने असे का केले?

माझ्या मुलांनंतर तो (मांजर) कायदेशीररित्या माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा भाग आहे, असे हॉगने सांगितले. मांजरीशी लग्न करून, मी माझ्या भावी घरमालकांना सांगू शकेन की आम्ही तुमच्याकडे जोडपे म्हणून राहू. यामुळे आम्ही कोणत्याही परिस्थितीत वेगळे होऊ शकत नाही.

हॉग म्हणाली की, मांजर तिच्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे जितकी तिची मुलं आहेत. ती म्हणाली, 'ती आता रस्त्यावर जगू शकते पण मांजर सोडणार नाही.' याआधी तिला त्याच्या दोन कुत्र्यांना सोडावे लागले होते, कारण तिच्या घरमालकाने तिला त्या प्राण्यांना घराबाहेर काढण्याची धमकी दिली होती.

19 एप्रिल रोजी समारंभ;
49 वर्षीय हॉगने 19 एप्रिल रोजी दक्षिण पूर्व लंडनमधील एका उद्यानात मांजरीशी लग्न केले. यादरम्यान या जोडप्याने टक्सिडो स्टाइलचे पोशाख परिधान केले होते. कारण मांजर ही टक्सिडो मांजर जातीची आहे. या लग्नात हॉगचे मित्रही उपस्थित होते. हॉगने सांगितले की 2020 मध्ये या मांजरीचा अपघात झाला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli : 'शिवप्रतिष्ठान'ची प्रशासनास दाेन दिवसांची मुदत, सांगली बंदचा दिला इशारा;जाणून घ्या नेमकं कारण

Sonali Bendre: क्या खुब लगती हो; बॉलिवूड सुंदरीचा झक्कास लूक!

Maharashtra Politics: राज्यात मोदी - अमित शहा यांच्यापेक्षा फडणवीसांविरोधात मोठी लाट: संजय राऊत

Today's Marathi News Live : कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी आता आम आदमी पक्षावरच कारवाई होण्याची शक्यता

Hemant Soren : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची तुरुंगातून सुटका होणार का? सुप्रीम कोर्ट अंतरिम जामिनावर काय म्हणालं?

SCROLL FOR NEXT