Rajasthan News Saam TV
देश विदेश

Rajasthan News : ५ मुलं तरी, आईचं अफेअर; रील बनवता बनवता जडलं प्रेम, घरदार सोडून महिला फरार

Woman Leave Five Kids and Husband for Lover : पळून गेलेली महिला विवाहीत आहे. ती इंस्टाग्रामवर रील व्हिडिओ बनवत होती. काही दिवसांतच तिचे ४० हजार फॉलोवर्स झाले.

Ruchika Jadhav

सीमा हैदरची लव्ह स्टोरी तुम्हा सर्वांना माहितच असेल. अशीच काहीशी आणखी एक घटना राजस्थानच्या जैसलमेर येथे देखील घडली आहे. या महिलेने प्रेमाची सर्व हद्द पार करून आपल्या प्रियकरासह पळ काढला आहे. या प्रकरणाची सध्या गावभर चर्चा सुरू आहे.

ऑनलाइन जडलं प्रेम

पळून गेलेली महिला विवाहीत आहे. ती इंस्टाग्रामवर रील व्हिडिओ बनवते. काही दिवसांतच तिचे ४० हजार फॉलोवर्स झाले. रील व्हिडिओ पाहून एका तरुणाने तिला प्रपोज केलं. त्यावर तिनेही होकार दिला. पतीसोबत राहणं तिला पसंत नव्हतं. त्यामुळे महिला आता प्रियकराकडे निघून गेली आहे.

५ लेकरांची आई

या महिलेला एकूण ५ मुलं आहे. आपल्या लहान मुलांचा काहीच विचार न करता महिलेने हा निर्णय घेतला आहे. पतीने पोलिसांत या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तसेच चौकशी करताना मी पतीकडे राहण्यास इच्छुक नाही असं तिने पोलिसांना सांगितलं आहे. राजस्थानमधून महिला गुजरातला आली असून बॉयफ्रेंडसह लिव्हइनमध्ये राहत आहे.

पतीकडून मारहाण होत होती

महिला आणि तिचा प्रियकर दोघेही घरातून पळून आले होते. त्यामुळे दोघांच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार केली होती. तक्रारीनुसार पोलीस शोध घेत या दोघांच्या घरी पोहोचले तेव्हा महिलेने पतीवर अनेक आरोप केले. पती माझ्यावर सतत संशय घेत होता. तो मला दररोज मारहाण करायचा. त्याच्या त्रासाला मी कंटाळले होते. त्या मुळे मी हा निर्णय घेतल्याचं महिलेने पोलिसांना सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT