Crime Saam tv
देश विदेश

भयंकर! ७ वर्षांची मुलगी शेजारी झोपलेली असतानाच पत्नीचा गळा चिरून खून; नंतर पतीने मेट्रोसमोर उडी मारून संपवलं आयुष्य

Crime News : कोलकात्यातील एका दुर्दैवी कौटुंबिक प्रकरणात एका महिलेचा घरात मृतदेह आढळल्यानंतर तिच्या पतीचा मेट्रो स्थानकाजवळ मृत्यू झाला. सात वर्षांची मुलगी घरात सुरक्षित अवस्थेत सापडली आहे.

Namdeo Kumbhar

Kolkata woman found dead at home latest news, : घरात ७ वर्षांची चिमुरडी गाढ झोपेत होती... आणि शेजारीच पती-पत्नीमध्ये चारित्र्याच्या संशयावरून कडाक्याचं भांडण सुरू होतं. या भांडणाचा शेवट इतका भयंकर होईल, याची कल्पना कोणीच केली नव्हती. रात्री पत्नीचा गळा चिरून खून केल्यानंतर, सकाळी पतीने धावत्या मेट्रोसमोर उडी मारत आपली जीवनयात्रा संपवली. या धक्कादायक घटनेने अख्खं कोलकाता शहर हादरून गेलं आहे. पोलिसांनी या दुहेरी मृत्यू प्रकरणाची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

७ वर्षांच्या मुलीशेजारीच पडला होता मृतदेह

कोलकाताजवळील हुगळी येथील ३९ वर्षीय दिपांकरने शनिवारी आपली ३१ वर्षीय पत्नी मोनिकाची कथितरित्या हत्या केली. त्यानंतर २० किलोमीटरचा प्रवास करून तो कोलकाता येथे पोहोचला आणि बेलगछिया स्टेशनवर मेट्रो ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री उशिरा, नटुंग्राममधील गव्हर्नमेंट कॉलनीत राहणाऱ्या दिपांकर आणि मोनिका सरकार यांच्या घरातून जोरजोरात भांडणाचे आवाज येत असल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं.

शनिवारी सकाळी ८ वाजता दिपांकरच्या घरी काम करणारा नोकर पोहोचला. त्यावेळी तिथे जे दिसलं त्याने तिच्या पायाखालची जमीनच सरकली. मोनिका रक्ताच्या थारोळ्यात मृत पडलेली होती. तिचा गळा चिरलेला होता आणि विशेष म्हणजे तिच्या मृतदेहाशेजारीच या जोडप्याची सात वर्षांची मुलगी गाढ झोपलेली होती; तर दिपांकर घरातून बेपत्ता होता. यानंतर तात्काळ शेजाऱ्यांना आणि पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.

मेट्रो स्टेशनवर ओळख पटली

पोलिसांनी या प्रकरणी 'बीएनएस'च्या (BNS) कलम ८५ आणि १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, त्या चिमुरडीला तिच्या आजीकडे (आईच्या आईकडे) सुपूर्द करण्यात आले आहे. घटनेनंतर दिपांकरचा शोध सुरू करण्यात आला आणि सर्व पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. अखेर दुपारी ३ वाजेच्या सुमारास, बेलगाछिया मेट्रो स्टेशनवर उडी मारून आत्महत्या केलेल्या व्यक्तीची ओळख दिपांकर म्हणून पटली.

हत्येचं नेमकं कारण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपांकरला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, असा आरोप मोनिकाच्या कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, दुसरीकडे शेजाऱ्यांनी पोलिसांना वेगळीच माहिती दिली. दिपांकरचेच एका विवाहित महिलेसोबत संबंध होते आणि याच कारणावरून या जोडप्यात नेहमी कडाक्याची भांडणे व्हायची, असं शेजाऱ्यांचं म्हणणं आहे. पोलीस आता या दोन्ही बाजूंचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वर्किंग वूमनसाठी बेस्ट इयररिंग्स; वेस्टर्न टू एथनिक दोन्ही कपड्यांवर दिसतील भारी

Maharashtra News Live Update: सोनम वांगचुक यांच्या मागणीच्या समर्थनात बुलढाण्यात एक दिवशीय बैठा सत्याग्रह

Tharala Tar Mag: 'ठरलं तर मग'मध्ये सायलीच्या डोहाळ्यांसाठी अर्जुनची धावपळ; पण एका चुकीमुळे बाळावर ओढावणार मोठं संकट?

Bulldozer Action: थेट खासदाराच्या कार्यालयावरच बुलडोझर कारवाई; पाच मजली ऑफिस केलं जमीनदोस्त, काय आहे प्रकरण?

Belly fat exercises: सुटलेलं पोट झटक्यात जाईल आत! दररोज करा फक्त हे 7 व्यायाम

SCROLL FOR NEXT