women Jumps infront of moving bus in Tamil Nadu CCTV viral SAAM TV
देश विदेश

Tamil Nadu News : मुलांच्या फीसाठी आईनं उचललं भयंकर पाऊल, धावत्या बससमोर स्वतःला झोकून दिलं

women Jumps infront of moving bus in Tamil Nadu : एका महिलेने धावत्या बससमोर उडी घेऊन मृत्यूला कवटाळलं. आपल्या मुलांची फी भरता यावी, यासाठी या महिलेनं हे धक्कादायक पाऊल उचलले.

साम न्यूज नेटवर्क

women Jumps infront of moving bus in Tamil Nadu : तामिळनाडूच्या सलेममध्ये एक भयंकर आणि हृदय हेलावणारी घटना घडली आहे. एका महिलेने धावत्या बससमोर उडी घेऊन मृत्यूला कवटाळलं. आपल्या मुलांची फी भरता यावी, यासाठी या महिलेनं हे धक्कादायक पाऊल उचलले, अशी माहिती समोर आली आहे.

मुलांची कॉलेजची फी भरता यावी म्हणून तामिळनाडूतील सलेममध्ये एका महिलेने धावत्या बससमोर उडी घेतली. मृत्यूनंतर सरकारकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईमधून तिच्या मुलांच्या कॉलेजची फी भरण्यासाठी मदत होईल, अशी तिला अपेक्षा होती. पप्पाथी (वय ३९) असे या महिलेचे नाव आहे. ती कंत्राटी सफाई कर्मचारी म्हणून काम करत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. (Police)

सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

ही हृदय पिळवटून टाकणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Footage) कैद झाली आहे. ४८ सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओची सत्यता तपासून बघितली नाही. महिला रस्त्याच्या कडेने चालताना दिसते. चालता चालता अचानक ती धावत्या बससमोर येते. वेगाने आलेल्या बसच्या (Bus Accident) धडकेनंतर ती जमिनीवर कोसळते. त्यात तिचा मृत्यू होतो, असे त्या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील महिन्यात एका महिलेचा बसच्या धडकेत मृत्यू झाला होता. अपघाती मृत्यूची नोंद केली होती. पण आता त्यात बदल करण्यात आला आहे.

महिला एकल पालक होती. तिला दोन मुलं आहेत. तिची मुलगी इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंगच्या अखेरच्या वर्षात शिकत आहे. तर तिचा मुलगा पॉलिटेक्निकमध्ये आर्किटेक्चरचं शिक्षण घेतोय. महिलेची आर्थिक परिस्थिती बेताची होती. अपघाती मृत्यूनंतर सरकारकडून नुकसान भरपाई मिळते, असं सांगून कुणीतरी तिची दिशाभूल केली होती. या घटनेचा तपास करत आहोत, असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: हाजीर हो! राहुल गांधींच्या अडचणी वाढणार, सावरकरांच्या बदनामी प्रकरणात न्यायालयाचं समन्स

Uddhav Thackeray : मुंबईवर घाला घातला तर हम काटेंगे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल,VIDEO

Watch Video: पावले धरती परतीची वाट! अरं 'देवा' भाऊच्या सभेकडे बहिणींनी फिरवली पाठ

Kolhapur Politics : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रकार; कोल्हापुरात प्रचार पत्रकावर तांदूळ, कापलेला लिंबू, अंगारा

Inflation: महागाई कमी होणार? नेटकऱ्याच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

SCROLL FOR NEXT