Telangana Momos News Saam TV
देश विदेश

Telangana Momos News : मोमोज खाल्ल्याने महिलेचा मृत्यू; अन्य 50 जणांची प्रकृती गंभीर

Woman Dies After Eating Momos: मोमोज खाल्ल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना तेलंगनामध्ये घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मोमोज सध्या प्रत्येक राज्यात मिळतात. तरुणांना या स्ट्रीट फूडचं क्रेझ लागलं आहे. प्रत्येक व्यक्ती स्ट्रीट फूडमध्ये फेमस असलेले मोमोज खातात. तुम्ही देखील मोमोज खात असाल. रस्त्यावर मिळणारे हेच मोमोज खाणे तेलंगनातील एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. मोमोज खाल्ल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे हे मोमोज खाल्ल्याने अन्य 50 जनांची प्रकृती बिघडली. सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत महिलेने थोडी भूक लागल्याने हलके फुलके मोमोज खाण्यासाठी घेतले होते. मोमोज खाऊन झाल्यावर तिला अचानक त्रास होऊ लगला. त्यानंतर ती धाडकन जमिनीवर आदळली आणि यातच तिचा मृत्यू झाला.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बंजारा हिल्स परिसरात हा फूड स्टॉल लावण्यात आला होता. येथे ३१ वर्षीय रेशमा फिरण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी हे मोमोज खाल्ले होते. महिलेचा मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेतली. तसेच पोलिसांनी या परिसरात मोमोज विकणाऱ्या दुकानदाराला ताब्यात घेतलं आहे.

महिलेच्या मृत्यूमागे फूड पॉइजन कारण असल्याचं समजलं आहे. यावर डॉक्टरांनी म्हटलं की, हे फूड पॉइजन पक्त मोमोज खाल्ल्याने नाही तर मेओनीज आणि शेजवान चटनीमुळे सुद्धा झालेले असू शकते. पोलिसांनी दोघांना देखील ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली आहे.

या चौकशीत समजले की, शहरातील अन्य काही व्यक्तींना देखील हा त्रास होत आहे. व्यक्ती रुग्णालयात उपचार घेत आहेत. ज्या ठिकाणी मोमोज विकले आणि बनवले जात होते ती जागा अतिशय अस्वच्छ होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Business Ideas: फक्त १४ हजारांनी सुरु करू शकता 'हा' बिझनेस; दररोज करू शकता १८ हजारांची कमाई

Lakshmi Pujan Muhurta: घर, ऑफिस, व्यवसायासाठी जाणून घ्या लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त

IPL Teams Retention: 7 संघांचे रिटेन केलेले खेळाडू ठरले! धोनी CSK कडूनच खेळणार; पाहा लिस्ट

Maharashtra News Live Updates: तब्बल १०० पेक्षा अधिक घरफोडी करणाऱ्या चोरट्याला पुणे पोलिसांकडून अटक

EPFO Recruitment: फ्रेशर्ससाठी आनंदाची बातमी; EPFO मध्ये नोकरी अन् ६५००० रुपये पगार; पात्रता काय?

SCROLL FOR NEXT