Kerala News  Saam Tv
देश विदेश

Kerala News : ऑनलाईन ऑर्डर केलेली बिर्याणी खाल्ल्याने महिलेचा मृत्यू; केरळमधील धक्कादायक घटना

अन्नातून विषबाधा झाल्याच्या संशयास्पद प्रकरणात एका 20 वर्षीय महिलेचा मृत्यू.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kerala News : पेरुंबला येथील रहिवासी एका महिलेने कासारगोड येथील एका रेस्टॉरंटमधून ऑनलाइन ऑर्डर केलेल्या कुझीमंथीचे सेवन केले होते आणि त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू होते.

त्यानंतर महिलेला अन्नातून विषबाधा झाल्याचे उघड झाले. या 20 वर्षीय महिलेचा स्थानिक हॉटेलमधून ऑर्डर केलेल्या 'कुझीमंथी' या प्रकारच्या बिर्याणीचे सेवन केल्यामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी सांगितले की, पेरुंबला येथील रहिवासी अंजू श्रीपार्वती हिने 31 डिसेंबर रोजी कासारगोड येथील एका ,रेस्टॉरंटमधून ऑनलाइन ऑर्डर केलेल्या कुझीमंथीचे सेवन केले होते आणि त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू होते.

पोलिसांनी पीटीआय-भाषेला सांगितले की, "मुलीच्या पालकांनी या संदर्भात तक्रार केली त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला." शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते तेथून तिला कर्नाटकातील मंगळुरू येथील दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जॉर्ज यांनी पथनामथिट्टा येथे पत्रकारांना सांगितले की, अन्न सुरक्षा आयुक्तांना या घटनेबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यांतर्गत (FSSA) अन्नातून विषबाधा केल्याचा आरोप असलेल्या हॉटेल्सचा परवाना रद्द करण्यात येईल, असे ते म्हणाले. या आठवड्याच्या सुरुवातीला, कोट्टयम मेडिकल कॉलेजमधील परिचारिका कोझिकोडमधील भोजनालयातील अन्न खाल्ल्याने मरण पावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update: अचानक गायब झालेला मान्सून धो धो बरसतोय! कोणत्या जिल्ह्यांना धोका?

Mumbai Crime : तरुणीने डेटिंग ॲपवरून ओळख केली; हॉटेलमध्ये एकटं बोलावलं अन्...; बोरिवलीतील तरुणासोबत घडला भयंकर प्रकार

Maharashtra Live News Update : नाशिकच्या इगतपुरीत दरड कोसळली, आदिवासी पाड्यांचा संपर्क तुटला

Nashik Crime News: नाशिकमध्ये चड्डी गँगचा कहर; घरात घुसून ४ तोळे सोनं लंपास| VIDEO

Israel : इराणनंतर इस्रायलचा येमेनवर हल्ला, येमेनची 3 प्रमुख बंदरं उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT