Crime News पायाचं हाड तुटलं, पण डॉक्टरांनी ऑपरेशन केलं हृदयाचं; दुसऱ्या दिवशी महिलेने गमावला जीव  CHATGPT
देश विदेश

Crime News : पायाचं हाड तुटलं, पण डॉक्टरांनी ऑपरेशन केलं हृदयाचं; दुसऱ्या दिवशी महिलेने गमावला जीव

Hariyana Crime News : हरियाणातील पानीपत येथे उपचारादरम्यान डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आले आहे. पायाचे हाड तुटलेल्या महिलेवर परवानगीशिवाय हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली आणि म्हणून महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी डॉक्टराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे.

Saam Tv

डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे चक्क एका महिलेला आपले प्राण गमवावे लागले आहेत. हरियाणाच्या पानीपत येथे महिलेचा अपघात झाला. तिला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. रूग्णालयात डॉक्टरांनी तिच्यावर वेळेत उपचार सुरू केले. पण कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानुसार परवानगी न घेता महिलेच्या हृदयाचे ऑपरेशन करण्यात आले. त्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. गुड्डी देवी असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे.

महिलेच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार २४ जुलै २०२६ ला महिलेचा अपघात झाला होता. यात तिच्या पायाला दुखापत झाली अन् पायाचे हाड तुटले. उपचारासाठी तिला जवळच्या पार्क रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याच्या आईचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानुसार ऑपरेशन करण्याआधी डॉक्टरांनी त्यांना कोणतीच पुर्वकल्पना दिली नव्हती. त्यांची परवानगी देखील घेतली नव्हती.पायाचे हाड तुटलेले असताना पायाच ऑपरेशन करणं गरजेच होतं पण डॉक्टरांनी त्यांच्या हृदयाचे का ऑपरेशन केले,असा सवाल कुंटुंबीयांनी केला आहे.

कुटुंबीयांनी घडलेल्या घटनेचा जाब डॉक्टरांना विचारताच डॉक्टरांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कुटुंबीयांवर दबाव टाकत दमदाटी केली, कोणाला सांगायचे असेल त्यांना सांगा, पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार करणार असाल तर बिंधास्त करा आम्ही कोणालाही घाबरत नाही. असा दम पीडीत कुटुंबीयांना दिला.

त्यानंतर मृत महिलेच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात जाऊन डॉक्टारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी डॉक्टरांना बेड्या ठोकल्या. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून मेडिकल रिपोर्ट आणि योग्य तपास करूनच पुढील कारवाई करण्यात येणार आहे. परंतु रूग्णालय प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. असे पोलिसांनी सांगितले

Maharashtra News Live Update: नवी मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट

Kanyapujan Gifts : नवरात्रीत कन्या पूजनाला द्या ६ हटके गिफ्ट्स? मुलींच्या चेहऱ्यावर हसू आणणारे बजेटफ्रेंडली वाण

Saturday Horoscope : भावनेपेक्षा व्यवहाराला महत्त्व द्या! ७ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत खालवली; तातडीनं रुग्णालयात दाखल

विधानपरिषद निवडणुकीत शिंदेसेना-भाजप आमनेसामने; महायुतीतला वाद चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT