आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्याचा संकल्प काँग्रेसच्या दिल्लीतील बैठकीत सोडण्यात आला. तसंच यावेळी निवडणूक विजयाचा फॉर्म्युला ठरल्याचं बोललं जातं. दलित, ओबीसी, आदिवासी आणि अल्पसंख्याकांना लोकसभा निवडणुकीत सरासरी जागा देण्यासंदर्भातही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.
(साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका (2024 Loksabha Election) आणि त्याआधीच काढण्यात येणाऱ्या भारत न्याय यात्रेसाठी (Bharat Nyay Yatra) पक्षाने केलेल्या तयारीवर काँग्रेसच्या बैठकीत चर्चा झाली. तसेच यावेळी संसदेतील खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरही चर्चा झाली.
यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) महाराष्ट्रातील जागावाटपाच्या मुद्द्यावरही आजच्या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यात ही चर्चा झाली.
एनडीए ही फक्त नावापुरती असून, INDIA आघाडीतील पक्ष लोकांच्या मनात रुजलेले असून, त्यांच्याकडे कार्यकर्त्यांनी मोठी फळी आणि विचारधारा आहे. भाजप गेल्या १० वर्षांत अपयशी ठरली आहे. त्यामुळं भावनात्मक मुद्दे घेऊन लोकांची दिशाभूल करत आहे, असा आरोप या बैठकीत करण्यात आला. भाजपच्या खोट्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी इंडिया आघाडीने एकजूट दाखवणे गरजेचं असल्याचेही वरिष्ठ नेते म्हणाले. भारत न्याय यात्रा आपल्याला यशस्वी करायची आहे, असा निर्धारही या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
दिल्लीतील बैठकीदरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील जागावाटपासंदर्भातही (Maharashtra Politics) प्रारंभिक चर्चा झाल्याचे सांगितले जाते. काँग्रेसचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात ही चर्चा झाली.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत प्रथम राज्यस्तरावर निर्णय होईल. त्यावर दिल्लीत शिक्कामोर्तब होईल. पक्षाची ताकद राज्यात किती आहे यावरही चर्चा झाल्याचे कळते. महाराष्ट्रात काँग्रेस किती जागांवर विजयी होऊ शकतो, याची माहितीही या दोन्ही नेत्यांनी खरगे यांना दिली. निवडणुका मित्रपक्षांना सोबत घेऊनच लढायच्या आहेत, अशा सूचनाही खरगे यांनी या नेत्यांना दिल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.
भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसांची शनिवारी, ६ जानेवारीला संध्याकाळी ५ वाजता भाजप कार्यालयात बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार असल्याचे सांगितले जाते. या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित असतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.