प्रियंका गांधी ''उत्तर प्रदेशची आशा'' बनणार? या नेत्यानं केलं मोठं वक्तव्य... Saam Tv News
देश विदेश

प्रियंका गांधी ''उत्तर प्रदेशची आशा'' बनणार? 'या' नेत्यानं केलं मोठं वक्तव्य...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लखनऊ: 2022 मध्ये उत्तर प्रदेशसह देशातील चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी उत्तर प्रदेश कॉंग्रेसनं कंबर कसली आहे. कॉंग्रेसने उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदासाठी अद्यापही अधिकृतरीत्या नाव घोषित केलं नसले तरी त्याचे संकेत द्यायला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदासाठी कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच नाव आता समोर आलं आहे. (Will Priyanka Gandhi become "Hope of Uttar Pradesh"? 'this' leader made a big statement...)

हे देखील पहा -

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद हे म्हणाले की, “आम्ही २०२२ ची युपी विधानसभा निवडणूक प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहोत. प्रियांका गांधी इथे काँग्रेसच्या विजयासाठी कठोर परिश्रम घेत आहेत. त्याचसोबत पुढे आम्ही त्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करू शकतो.” उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ करिता काँग्रेसने एक ‘प्रतिज्ञा यात्रा’ काढण्याची देखील घोषणा केली आहे. “काँग्रेस प्रतिज्ञा यात्रा: हम वचन निभाएंगे” असं या यात्रेचं नाव असेल. उत्तर प्रदेशच्या या निवडणुकीपूर्वी राज्यातील सर्वसामान्य लोकांसोबतचा संपर्क अधिक वाढवण्यासाठी घरोघरी जाण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून हा तब्बल १२ हजार किलोमीटर इतका लांबचा प्रवास केला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशवर सध्या भाजपचे शासन आहे. योगी आदित्यानाथ आपली आपलं मुख्यमंत्रीपद कायम राहण्यासाठी ताकद लावणार आहेत. तर अखिलेश यादव, मायावती यांसारखे मोठे पक्ष सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी संघर्ष करणार आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro Tips: ओल्या केसांमध्ये सिंदूर का लावू नये? जाणून घ्या शास्त्रीय कारण...

Marathi News Live Updates : लोहगड किल्ल्यावर पर्यटकांची मोठी गर्दी

Mumbai News : मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

Viral News: शाब्बास पठ्ठ्यांनो! कपडे शिलाईसाठी तरुणांचा हटके जुगाड, थेट बाईकचा वापर करुन काम केलं सोपं; पाहा VIDEO

High Court News: विवाहित महिला लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याचा आरोप करु शकत नाही: हायकोर्ट

SCROLL FOR NEXT