स्वदेशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कू अॅप (Koo App) मध्ये लवकरच मोठी भरती केली जाणार आहे. कंपनीच्या अभियांत्रिकी, कम्युनिटी आणि प्रॉडक्टस् या विभागात ही मोठी भरती केली जाणार आहे. कू कंपनीचे सह - संस्थापक अप्रमेय राधाकृष्ण यांनी ही माहिती दिली आहे. (Indigenous social media platform Koo App will soon recruit 500 people)
हे देखील पहा -
कू अॅप (Koo App) या कंपनीमध्ये सध्या 200 कर्मचारी आहेत. अभियांत्रिकी, प्रोडक्ट्स आणि कम्यूनिटी मॅनेजमेंटसारख्या विभागांमध्ये नवीन नियुक्त्यांसह कर्मचारी वर्गाची संख्या पुढील एका वर्षात 500 पर्यंत वाढवली जाणार आहे. या व्यतिरिक्त ही कू सोशल मीडिया कंपनी शासकीय संबंध, मार्केटिंग, ब्रँड मार्केटिंग सारख्या क्षेत्रात नवीन कर्मचारी भरती करणार आहे. परंतु, यामध्ये छोट्या टीम काम करतील. राधाकृष्ण म्हणाले, "आम्हाला चांगल्या आणि प्रतिभावंत लोकांना या कामासाठी घ्यायचे आहे. ते कूसाठी काम करू शकतात आणि भारतीय तंत्रज्ञानाला जागतिक पातळीवर घेऊन जाऊ शकतात.
कू अॅप (Koo App) एक मायक्रोब्लॉगिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. १४ नोव्हेंबर २०१९ ला या अॅपची सुरवात झाली होती. मेक इन इंडिया, डिजीटल इंडिया या उपक्रमांतर्गत हे अ्ॅप बनवण्यात आले होते. या प्लॅटफॉर्मने नुकताच एक कोटी युजर्सचा टप्पा ओलांडला आहे. या अॅपवर अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते हे प्रामुख्याने सक्रिय आहेत. मात्र भाजप वगळता इतर पक्षातील नेते या अॅपबाबत फारसे उत्साही दिसत नाहीत.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.