गणेशोत्सवासाठी ''ताटी उघडा ज्ञानेश्वरा'' हा सुंदर देखावा नक्की पहा

मावळातील देहूरोड येथील काजल भेगडे यांनी आपल्या घरात गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली. यात त्यांनी ताटी उघडा ज्ञानेश्वरा, हा पौराणिक देखावा सादर केला आहे.
गणेशोत्सवासाठी ''ताटी उघडा ज्ञानेश्वरा'' हा सुंदर देखावा नक्की पहा
गणेशोत्सवासाठी ''ताटी उघडा ज्ञानेश्वरा'' हा सुंदर देखावा नक्की पहादिलीप कांबळे
Published On

मावळ: मावळातील देहूरोड येथील काजल भेगडे यांनी आपल्या घरात गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली. यात त्यांनी ताटी उघडा ज्ञानेश्वरा, हा पौराणिक देखावा सादर केला आहे. विशेष म्हणजे हा देखावा पुर्णतः इकोफ्रेंडली आहे. (For Ganeshotsav, be sure to see the beautiful scene by Kajal Bhegde)

हे देखील पहा -

मुळातच संगीत विशारद असलेली काजल हिने भाताचं पेंडा, बांबू, माती, पिंपळाचे, वडाचे झाड, तुळस यांसह पर्यावरणपूरक वस्तू वापरुन देखावा सादर केला. संपूर्ण जगाचा ताप दूर करणारे ज्ञानेश्वर माऊली पण जेव्हा तत्कालीन समाजकंटकांनी त्यांना त्रास दिला व आई वडिलांच्या देहांत प्रायश्चित्तानंतरही हे लोक आपल्याला त्रास देतात म्हणून त्याक्षणी उद्विग्न होऊन माऊली ताटी लाऊन घरात बसतात तेव्हा त्यांची धाकटी बहिण मुक्ताई त्यांची समजूत काढत होती. केवळ झोपडीची ताटीच नव्हे तर मनाची दारेही उघड असा गूढ संदेश देते.

गणेशोत्सवासाठी ''ताटी उघडा ज्ञानेश्वरा'' हा सुंदर देखावा नक्की पहा
टाकळी गावात कोरोना लसीकरणाच्या देखाव्यात गौराईची स्थापना...

कोरोनामुळे मंदिरं बंद आहेत, मात्र मंदिर उघडले तर मनःशांती मिळते असं तिचं मत आहे. या सुंदर आणि पौराणिक देखाव्याने सर्वांचेच लक्ष वेधले असून काजलचे कौतुक होत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com