Petrol Diesel Under GST Saam Tv
देश विदेश

Petrol Diesel Under GST: इंधनाचे दर होणार कमी, मोदी सरकार पेट्रोल- डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणणार?

GST News: लवकरच इंडियाचे दर देशात कमी होऊ शकतात. याचं कारण म्हणजे केंद्रातील मोदी सरकार पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणू शकते. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणू शकते, अशी माहिती समोर येत आहे. याबद्दल बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी सांगितले की, पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा केंद्र सरकारचा हेतू नेहमीच होता आणि आता राज्यांनी एकत्र येऊन त्याचे दर ठरवायचे आहेत.

त्या म्हणाल्या की, माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटी कायद्यात पेट्रोल आणि डिझेलचा समावेश करण्याची तरतूद आधीच केली आहे. आता सर्व राज्यांनी एकत्र येऊन दर ठरवण्यासाठी चर्चा करायची आहे.

दरम्यान, 1 जुलै 2017 रोजी जीएसटी लागू करण्यात आला होता. त्यावेळी त्यात एक अनेक केंद्र आणि राज्य शुल्क समाविष्ट करण्यात आले होते. यात कच्चे तेल, नैसर्गिक वायू, पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधन (ATF) या पाच वस्तूंवर जीएसटी कायद्यांतर्गत नंतर कर आकारला जाईल, असा निर्णय घेण्यात आला होता.

निर्मला सीतारामन म्हणाल्या की, जीएसटी लागू करताना काही काळानंतर पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा केंद्र सरकारचा मानस होता. त्या म्हणाल्या की, “जीएसटीमध्ये आणण्याची तरतूद आधीच करण्यात आली आहे. आता फक्त एकच निर्णय घ्यायचा आहे की, जीएसटी कौन्सिलमध्ये राज्ये सहमत आहेत आणि त्यानंतर ते कोणत्या दरासाठी तयार आहेत, ते ठरवायचे आहे.'' जीएसटी कौन्सिलच्या 53 व्या बैठकीनंतर सीतारामन म्हणाले की, एकदा हा निर्णय घेतला की अधिनियमात लागू करण्यात येईल.

यासोबतच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, केंद्रीय जीएसटी प्रशासनाच्या अंतर्गत एकूण ५८.६२ लाख करदात्यांपैकी दोन टक्क्यांहून कमी करदात्यांना कर नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway:मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ३ वाहनांचा विचित्र अपघात, २ जणांचा जागीच मृत्यू; मिसिंग लिंकवर वाहतूक ठप्प

Famous Singer Death : संगीत क्षेत्रातला अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ गायकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

महागड्या क्रिम्स कशाला? चेहऱ्याचे काळे डाग आणि खाज घालवण्यासाठी कापूर ठरेल वरदान; पाहा वापरण्याची योग्य पद्धत!

Monsoon Update : मान्सून लांबणीवर, पण राज्यात आज वादळी पावसाची शक्यता; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

IPL फायनल हरल्यानंतर गुजरात टायटन्ससोबत मोठी दुर्घटना; भररस्त्यात टीमच्या बसला लागली आग, उडाली एकच खळबळ

SCROLL FOR NEXT