Arvind Kejriwal: ANI
देश विदेश

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना आज जामीन मिळणार? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

Delhi Liquor Scam: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एक महिन्याहून अधिक काळ तुरुंगात आहेत. त्यांना जामीन मिळणार की नाही, यावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे.

Satish Daud

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एक महिन्याहून अधिक काळ तुरुंगात आहेत. त्यांना जामीन मिळणार की नाही, यावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडीने अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. या अटकेला केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायलयात आव्हान दिले होते.

ट्रायल कोर्ट आणि दिल्ली हायकोर्टातून दिलासा न मिळाल्याने केजरीवाल यांनी ईडीविरोधात सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली होती. मंगळवारी सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर केजरीवाल यांच्या जामीनावर सुनावणी झाली.

त्यानंतर शुक्रवारी निकाल जाहीर करू, असं खंडपीठाने सांगितलं होतं. तत्पुर्वी ईडीने गुरुवारी प्रतिज्ञापत्र दाखल करून अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अंतरिम जामीन देण्यास जोरदार विरोध केला. लोकसभा निवडणूक प्रचारासाठी अंतरिम जामीन देणे योग्य होणार नाही, असे ईडीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

ईडीच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात युक्तीवाद केला होता. निवडणूक प्रचारासाठी अंतरिम जामीन देणे हा घटनात्मक किंवा मूलभूत अधिकार किंवा कायदेशीर अधिकार नाही. कापणीच्या वेळी शेतकऱ्याने जामीन मागितला तर त्यालाही जामीन मिळेल का? असा सवालही तुषार मेहता यांनी उपस्थित केला होता.

तसेच अरविंद केजरीवाल निवडणूकही लढवत नसल्याचे तपास यंत्रणेने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कायदेशीर पथकाने सुनावणी पूर्ण झाल्यानंतर शपथपत्र दाखल करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर आज सुप्रीम कोर्ट निकाल देणार आहे, त्यामुळे या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा,पोलीस ठाण्याबाहेर आमनेसामने

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव – "रुखवत" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

VIDEO : शाब्बास! असं धाडस करायला वाघाचं काळीज लागतं, तरुणानं ३ मजले चढून २ मुलांना आगीतून वाचवलं

Maharashtra News Live Updates: नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा, स्लीप वाटण्यावरून वाद

Pune Crime: थंड वडापाव दिला म्हणून ग्राहक तापला, स्नॅक्स सेंटरचालकाला काचेची बरणी फेकून मारली

SCROLL FOR NEXT