Aam Aadmi Party National Party Saam TV
देश विदेश

Aam Aadmi Party : आम आदमी पार्टी राष्ट्रीय पक्ष होणार? राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी काय आहेत निकष? वाचा सविस्तर...

Aam Aadmi Party National Party: आम आदमी पक्षाने राष्ट्रीय पक्ष होण्यासाठीचे निकष पूर्ण केलेले आहेत.

Shivaji Kale

Aam Aadmi Party News: देशात आज गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे निकाल हाती येणार आहेत. या दोन्ही राज्यात भाजप आघाडीवर सध्यातरी दिसत आहे. यंदा आम आदमी पार्टी (AAP) हा पक्षदेखील निवडणूक लढवत आहे. अशात आम आदमी पक्षाने एक मोठी भरारी घेतली आहे. आम आदमी पक्षाने राष्ट्रीय पक्ष होण्यासाठीचे निकष पूर्ण केलेले आहेत. त्यामुळे सुरुवातीला दिल्लीपुरता मर्यादित असलेला आप हा प्रादेशिक पक्ष आता राष्ट्रीय पक्ष होण्याच्या मार्गावर आहे. याबाबतचा फैसला आज होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आम आदमी पक्षाला ४ राज्यांमध्ये ६ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान मिळालेलं आहे. राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी ४ राज्यात २ विधानसभा जागांवर निवडून येणं आवश्यक आहे. दिल्ली, गोवा आणि पंजाबमध्ये विधानसभा निवडणूका लढवल्यानंतर आम आदमी पक्षाने हा निकष पूर्ण केला आहे. त्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जाऊ शकतो.

आम आदमी पार्टी राष्ट्रीय पक्ष होणार का याचा फैसला आज होणार आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूकीचा निकाल आज येणार आहे. त्या अगोदरच आम आदमी पक्षाने स्वतःला राष्ट्रीय पक्ष म्हणून जाहीर केलं आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी कोणत्याही पक्षाला चार राज्यात कमीत कमी ६ टक्के मतदान घ्यावे लागते आणि दोन विधानसभा काबीज कराव्या लागतात. आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुक लढली आणि जिंकली, तसेच पंजाबमध्येही आपचा मुख्यमंत्री आहे, सोबतच दिल्ली, पंजाबह गोव्यामध्येही आपला राज्य पक्षाचा दर्जा या अगोदरच मिळवला आहे.

त्यानंतर आम आदमी पक्षाला हा विश्वास आहे की, आम आदमी पक्ष गुजरात मध्ये ६ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान मिळवेल, त्यामुळे आम आदमी पक्षाने गुजरात विधानसभा निवडणूकांचे (Election 2022) निकाल हाती येण्याअगोदरच दिल्ली येथील कार्यालयात राष्ट्रीय पक्षाचा बोर्ड लावला आहे.

या '3' निकषांनी निवडणूक आयोग ठरवते राष्ट्रीय पक्षाचा दर्जा

१) किमान चार राज्यांमध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान ६ टक्के मते मिळणे आवश्यक किंवा किमान चार सभासद लोकसभेत निवडून येणे अपेक्षित आहे.

२) आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत किमान तीन राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागांपैकी २ टक्के जागा निवडून येणे आवश्यक असते.

३) किमान चार राज्यांमध्ये राज्यपातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळणे आवश्यक आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

Pune: काय रे तुम्हाला मस्ती आली आहे का? लोखंडी रॉड अन् दगडाने मारहाण; पुण्यात भरचौकात टोळक्यांचा राडा, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT