Haryana Crime Saam tv
देश विदेश

Horrific incident : दोघांमध्ये तिसरा आला अन् घात झाला; प्रेमात आंधळ्या झालेल्या रीलस्टारने नवऱ्याला संपवलं

Haryana Crime News: दोघांमध्ये तिसरा आल्याने रीलस्टारने भयानक कृत्य केलं आहे. प्रेमात आंधळ्या झालेल्या रीलस्टारने नवऱ्याला संपवण्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

उत्तर प्रदेशच्या मेरठमधील सौरभ राजपूत हत्याकांडाचा तपास पूर्ण झालेला नसताना आणखी एक हादरवणारी घटना हरियाणामध्ये घडली आहे. रीलस्टारने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला संपवल्याची घटना घडली आहे. हत्या केल्यानंतर दोघांनी मिळून नवऱ्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर पत्नीने हादरवणारं कृत्य केल्याचं बोललं जात आहे.

काय आहे प्रकरण?

हरियाणा हत्याकांड अनैतिक संबंधामुळे घडल्याचं उघडकीस आलं आहे. रवीना ही इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध रीलस्टार आहे. तिला रील्स तयार करण्याची आवड आहे. रीलस्टार रवीनाला सोशल मीडियावर ३० हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत. रवीना रेवाडी येथे राहणारी आहे. तर तिचा बॉयफ्रेंड हा प्रेमनगरच्या हांसी येथे राहणारा आहे. बॉयफ्रेंड सुरेश हा युट्यूबर असल्याचं बोललं जात आहे. तर नवऱ्याचं नाव प्रवीण आहे. ३५ वर्षीय प्रवीण हा जुन्या बस स्टँडजवळील गुजरोंच्या ढाणी येथे राहणारा होता.

मीडिया रिपोर्टनुसार, रवीना आणि सुरेश गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. २५ मार्च रोजी प्रवीणने दोघांना नको त्या अवस्थेत पाहिलं. त्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झालं. रवीना आणि सुरेशने मिळून प्रवीणची गळा दाबून हत्या केली. या संपूर्ण घटनेत प्रवीणचा मृत्यू झाला.

सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या रवीनाला रीन तयार करण्याची आवड होती. तिच्या या आवडीवर प्रवीणच्या कुटुंबाचा आक्षेप होता. रील्सवरून प्रवीण आणि रवीनामध्ये कडाक्याचं भांडण व्हायचं. तिच्या रील्समध्ये अनेक प्रसिद्ध कलाकार दिसले आहेत.

३२ वर्षीय रवीना आणि सुरेशची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून संपर्कात आल्यानंतर त्यांनी दीड वर्ष एकत्र रील्स तयार केले. यावरही प्रवीणचा आक्षेप होता. प्रवीणच्या हत्येनंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशी सुरु केली आहे. या चौकशीदरम्यान दोघांनी अनेक मोठे खुलासे केले आहेत. प्रवीणची हत्या केल्यानंतर रवीनाला कोणताही पश्चाताप तिच्या चेहऱ्यावर झालेला दिसत नव्हता. प्रवीणची हत्या केल्यानंतर दोघांनी मिळून मध्यरात्री मृतदेहाची विल्हेवाट लावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT