Uttar Pradesh Police Saam TV
देश विदेश

इस्त्रो वैज्ञानिकाची पत्नीच निघाली चोर; पोलिसांनाही दिला गुंगारा

पोलिसांनी ही बाब उघड करून अनेकांना विचार करायला भाग पाडले आहे.

वृत्तसंस्था

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हरदोई जिल्ह्यात पोलिसांनी एका मोठ्या चोरीचा खुलासा केला आहे. जेव्हा पोलिसांनी आरोपीच्या नावांचा खुलासा केला तेव्हा लोकांच्या पायाखालील जमीन सकरली.कारण मोठी कथा सांगणारीच घरातील सून चोर निघाली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार घरातील सूनेने आपला दिर आणि नंदेचे दागिने आपल्या बहिनीला दिले होते आणि नंतर चोरीची कहाणी बनवली होती. परंतु पोलिसांच्या चौकशीत ती सापडली. तसेच पोलिसांनी सांगितले आहे की इस्त्रोच्या वैज्ञाविकाच्या घरुन २५ लाखांच्या चोरीची घटना खोटी आहे. सत्यता अशी आहे की इस्त्रो वैज्ञानिकाच्या पत्नीने आपला मित्र आणि बहिनीच्या साथीने ही चोरी केली होती.

पोलिसांनी ही बाब उघड करून अनेकांना विचार करायला भाग पाडले आहे. कारण या प्रकरणातील सूत्रधार ही घरची सून असून तिने दिर व नंदेच्या लग्नापूर्वी त्यांच्यासाठी ठेवलेले दागिने तिच्या मैत्रिणीला दिले होते. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी पोलिसांनी खुलासा केला की, इस्रोच्या वैज्ञानिकाची पत्नी मुस्कानने तिची बहीण तनु हिला दागिने दिले होते. कारण काही वेळातच मुस्कानचे दिर आणि ननंद लग्न करणार होते. जेणेकरून त्यांच्या लग्नात अडथळा येऊ शकेल. त्याचवेळी तिने दरोड्याची कहाणी रचली आणि त्यानंतर पोलिसांनी तपास केला, तर प्रकरण वेगळेच निघाले.

इस्त्रो वैज्ञानिकाची पत्नी निघाली चोर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीची कहाणी रचणाऱ्या आरोपी महिलेचा पती शशांक द्विवेदी हा इस्रोमध्ये शास्त्रज्ञ आहे. मुस्कानने लग्नाचे दागिने मैत्रिण अमिताला दिले होते आणि त्यानंतर पुन्हा 29 मार्च रोजी तीन व्यक्ती दिवसाढवळ्या घरात घुसून 25 लाखांचे दागिने आणि रोकड लुटून नेल्याची माहिती पोलिसांना दिली. शशांक द्विवेदी यांची आई कांती द्विवेदी यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली होती. त्याचवेळी, इस्रोच्या शास्त्रज्ञाशी संबंधित प्रकरणामुळे पोलीस खुलासा करण्यात गुंतले.

पोलिसांना घरातीलच सदस्य चोर असल्याची शंका

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, या प्रकरणात घरातील काही सदस्यांचा हात असल्याची खात्री पटली आणि ठोस माहितीवरून शहरातील सीतापूर रोड येथील रहिवासी राजेश कुमार यांची मुलगी तनु दीक्षित आणि अमिता गुप्ता पत्नी, अजय कुमार यांचा ताब्यात घेतले. त्यामुळे गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर सर्वांनी सांगितले की, मुस्कानने तिचे दागिने तनूला दिले होते आणि त्यानंतर दरोड्याची कहाणी घडली.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दराने उच्चांक गाठला! १० तोळ्यामागे १२००० रुपयांची वाढ; वाचा आजचे भाव

Maharashtra Live News Update : खंडाळा बोगद्याजवळ ट्रकला आग; पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

जबरदस्ती शारीरिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात; इरफाननं ओळख लपवून तरूणींना फसवलं

Bigg Boss 19: प्रणित मोरेने अभिषेक बजाजच्या स्वप्नाचा केला चक्काचूर; सांगितलं अशनूर कौरला का केलं सेफ

Government Job: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात नोकरीची संधी; २९० पदांसाठी भरती; पगार मिळणार १,७७,५००; आजच करा अर्ज

SCROLL FOR NEXT