China’s Support for Pakistan saam tv
देश विदेश

Special Report: पाकड्यांपेक्षा भारताला शेजाऱ्यांचा धोका, भारताविरोधात पाकड्यांचा 'चीन + रुस' प्लॅन, भारताच्या कोंडीसाठी चीनी मैदानात?|VIDEO

China,Russia and Pakistan Strategic: भारत पाकिस्तान युद्ध भडकल्यास फक्त पाकिस्तानच नाही तर इतरही शेजाऱ्यांचा भारताला धोका असल्याचं समोर आलंय.. मात्र त्याची कारणं काय आहेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Bharat Mohalkar

पहलगाम हल्ला भारतीयांना चांगलाच जिव्हारी लागलाय.. त्यामुळेच तातडीने युद्ध करुन पाकड्यांना धडा शिकवण्याची, पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन नष्ट कऱण्याची मागणी देशवासियांकडून कऱण्यात येतीय....मात्र आता पाकड्यांपेक्षा भारताला शेजाऱ्यांचाच जास्त धोका असल्याचं समोर आलंय... ते नेमकं कसं? पाहूयात...

भारताची पाक, चीन, नेपाळ, म्यानमार आणि बांग्लादेशसोबत 15 हजार किमीची सीमा

चीनकडून पाकिस्तानला शस्त्रांचा पुरवठा

युद्ध भडकल्यास सीमेवरील लष्करी सॅटेलाईटद्वारे चीन पाकची मदत करणार

गृहयुद्धानंतर चीन्यांची बांग्लादेशींना भारताविरोधी फूस

चीन-म्यानमार दृढ संबंध, ईशान्य भारताला म्यानमारच्या दहशतवाद्यांचा धोका

नेपाळचे पंतप्रधान ओलींची भूमिका चीनकडे झुकलेली

एवढंच नाही तर भारताने शेजाऱ्यांपासून का सावध रहायला हवं? त्याविषयी आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेतलंय..

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती देत पाकड्यांच्या नांग्या ठेचायला सुरुवात केलीय. त्यामुळेच भयभीत झालेले पाकडे मदतीसाठी जगभर भीकेचा कटोरा घेऊन फिरत आहेत.. एवढंच नाही तर चीन आणि रशियासह पाकड्यांनी नवा गेम प्लॅन बनवलाय

पहलगाम हल्ल्यानंतर पाकड्यांविरोधात जगभरात रोष

हल्ल्याच्या तपासासाठी आंतरराष्ट्रीय चौकशी समिती स्थापन करावी

चौकशी समितीत चीन आणि रशियाच्या समावेशाची मागणी

चीन आणि रूसच्या मदतीने भारतावर दबाव वाढवण्याचा डाव

भारताने सार्क देशांच्या संघटनेवर आपला प्रभाव कायम ठेवलाय.. मात्र भारत चीन्यांच्या विस्तारवादी धोरणांमधील सर्वात मोठा अडथळा आहे.. त्यात भारत पाक युद्ध भडकल्यास चीन लष्करी सॅटेलाईटद्वारे इतर सीमेवरील लष्करी हालचालींची माहिती पाकड्यांना देण्याची शक्यता आहे.. एवढंच नाही तर पाकिस्तान, बांग्लादेश, म्यानमार, नेपाळला फूस लावून चीनी ड्रॅगन पाहूण्याच्या काठीने साप मारण्याच्या विचारात आहेत.. त्यामुळेच भारताने शेजाऱ्यांपासूनच सावध राहण्याची गरज आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

SCROLL FOR NEXT