Islamabad High Court ON Imran Khan Arrest saam tv
देश विदेश

Imran Khan Arrested: इम्रान खान यांना का अटक केली? इस्लामाबाद हायकोर्टाचा सवाल; पंतप्रधानांना समन्स बजावण्याचा इशारा

PTI chief Imran Khan Arrested: पाकिस्तानात पोलीस मंत्रालयाचे सचिव, अतिरिक्त ऍटर्नी जनरल यांना १५ मिनिटांत न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश

Chandrakant Jagtap

Islamabad High Court ON Imran Khan Arrest : पाकिस्तानच्या राजकारणाला धक्कादायक वळण मिळालं आहे. मंगळवारी दुपारी इस्लामाबाद उच्च न्यायालयात (IHC) उपस्थित असलेले पीटीआय प्रमुख इम्रान खान यांना रेंजर्सनी कोर्ट परिसरातून ताब्यात घेतले आहे. पीटीआयचे वकील फैसल चौधरी यांनी या घडामोडींना दुजोरा दिला आहे. पाकिस्तानातील स्थानिक वृत्तपत्र डॉन डॉट कॉमने याबाबतचे वृत्त दिले आहे.

दरम्यान इस्लामाबाद हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आमेर फारूक यांनी इस्लामाबादचे पोलीस प्रमुख अंतर्गत मंत्रालयाचे सचिव आणि अतिरिक्त ऍटर्नी जनरल यांना १५ मिनिटांत न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले. IHC मुख्य न्यायाधीश म्हणाले की ते "संयम" दाखवत आहे, परंतु इस्लामाबादचे पोलिस प्रमुख न्यायालयात हजर न झाल्यास पंतप्रधानांना "समन्स" बजावण्यात येईल असा इशाराही न्यायधीशांनी दिला आहे.

न्यायमूर्ती फारूख म्हणाले “न्यायालयात या आणि आम्हाला सांगा की इम्रानला का आणि कोणत्या प्रकरणात अटक करण्यात आली. दरम्यान इस्लामाबाद पोलिसांनी महानिरीक्षक (आयजी) अकबर नासिर खानच्या हवाल्याने एक निवेदन जारी केले आहेत. इम्रान यांना अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात त्यांचे संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली असल्याचे म्हटले आहे.

पोलिस प्रमुखांनी सांगितले की इस्लामाबादमधील परिस्थिती "सामान्य" आहे. शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे आणि उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई केली जाईल. रॉयटर्सच्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, इम्रान खान यांनी IHC च्या गेटमध्ये प्रवेश केल्यानंतर काही वेळातच निमलष्करी दलाच्या तुकड्या आणि शस्रधारी कर्मचारी वाहन त्याच्या मागे घुसले. गेटवरच त्यांनी इम्रान खान यांना रोखले आणि कडक सुरक्षा असतानाही काही वेळातच त्यांनी त्यांना पळवून नेले. (Pakistan News)

पीटीआयचे नेते मुसरत चीमा यांनी ट्विटरवर एका व्हिडिओ संदेशात म्हटले की “ते सध्या इम्रान खानचा छळ करत आहेत, ते खान साहेबांना मारहाण करत आहेत. त्यांनी खान साहेबांसोबत काहीतरी केले आहे, असे आरोप देखील त्यांनी केले आहे. पीटीआयच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटने इम्रानच्या वकिलाचा व्हिडिओही शेअर केला आहे. यात ते आयएचसीच्या बाहेर “अतिशय जखमी” झाल्याचे म्हटले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाच्या मुख्यप्रवेशद्वारासमोर भीषण अपघात,२ वर्षीय मुलीचा मृत्यू तर ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी

Vashi Toll Accident : वाशी टोल नाक्यावर भंयकर अपघात, नवरा-बायकोचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: अमरावतीमध्ये भीषण अपघात झाला, टोमॅटोने भरलेला पिकअप उलटला

Mumbai Bomb Threat: मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अटक, उत्तर प्रदेश कनेक्शन उघड

Malpua Recipe: सण-उत्सवासाठी घरच्या घरी मऊसर आणि रसाळ मालपुवा कसा बनवायचा? वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

SCROLL FOR NEXT