Chhattisgarh Assembly Election Saam Tv
देश विदेश

Chhattisgarh Election: छत्तीसगडमध्ये कोण होईल सीएम? भाजप- काँग्रेसमधील 'या' नेत्यांचं नाव शर्यतीत

Bharat Jadhav

Chhattisgarh Assembly Election Who Will CM:

छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यातील मतदान पार पडलं. या मतदानाचे निकाल ३ डिसेंबर हाती येणार आहेत. छत्तीसगडमध्ये आपल्याच पक्षाची सत्ता स्थापन होईल असा दावा काँग्रेस आणि भाजपकडून करण्यात येत आहे. आता राज्यात निकालाची आणि नवा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगलीय. मुख्यमंत्री कोण होईल याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. कारण दोन्ही पक्षाकडून सीएम कोण होणार हे सांगण्यात आलं नव्हतं. (Latest News)

काँग्रेस आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत चर्चासत्र सुरू झालंय. निवडणुकीच्या निकालानुसार याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो असं सांगण्यात येत आहे. तर काहींच्या मते राज्यात ओबीसी किंवा आदिवासी समाजातील नेत्याला यावेळी मुख्यमंत्री केलं जाणार आहे. तर एका बाजुला सुरू असलेल्या चर्चेनुसार सामान्य वर्गालील नेत्याला मुख्यमंत्री केलं जाऊ शकतं. दोन्ही पक्षातील कोणत्या नेत्याला मुख्यमंत्री पद मिळेल याचे कोडे आता निकालानंतर सुटणार आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

छत्तीसगडमध्ये २०१८ मध्ये भाजपचा पराभव झाला होता. तेव्हापासून भाजपने मुख्यमंत्रीपदाला चेहरा घोषित केलेला नाही. दुसरीकडे काँग्रेसने या निवडणुकीत सामूहिक नेतृत्वात निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र निवडणुकीच्या प्रचाराचे सुत्र सर्व भूपेश बघेल यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्यांनी ७२ निवडणुकीच्या सभा घेऊन राज्य पिंजून काढलंय.

काँग्रेसमध्ये कोणत्या नेत्यांच्या नावाची आहे चर्चा

हायकमांड जे निर्णय घेईल त्याला स्वीकारले जाईल असं दोन्ही पक्षातील नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. पण काँग्रेसचे सरकार आल्यास भूपेश बघेल किंवा टीएस सिंहदेव हे मुख्यमंत्री होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. जर एका नावावर सहमती झाली नाही तर या दोन्ही नेत्यांनाअडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.

जर आदिवासी प्रवर्गातून कोणाला संधी मिळेल अशी चर्चा होते तेव्हाव काँग्रेसकडून दीपक बैज यांना संधी मिळू शकते असं म्हटलं जातंय. विधानसभा अध्यक्ष चरण दास महंत यांना देखील संधी मिळू शकते.

भाजपमधील कोणत्या नेत्याची आहे चर्चा

भाजपमधूनही काही वर्षात अनेक चेहरे समोर आलेत. डॉ. रमन सिंग तीनवेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यामुळे भाजप सत्तेत आल्यास त्यांना मुख्यमंत्री केलं जाईल अशी चर्चा आहे. तर ओबीसी चेहरा असलेले भाजप प्रदेश अध्यक्ष अरुण साव आणि खासदार विजय बघेल याचेही नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे. राष्ट्रीय नेतृत्वाच्या जवळचे ओपी चौधरी यांचे नावही या शर्यतीत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

IND vs BAN, 1st Test: टीम इंडियाचा डाव आटोपला! जडेजाचं शतक थोडक्यात हुकलं, बांगलादेशचा युवा गोलंदाज चमकला

Jalna Accident : जालन्यात एसटी बस आणि ट्रक अपघातात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारे PHOTO पाहा

SCROLL FOR NEXT