justice uu lalit  Saam Tv
देश विदेश

कोण आहेत न्या. यू यू ललित? घेणार भारताच्या सरन्यायाधीश पदाची शपथ

विद्यमान सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे या महिन्यात निवृत्त होत आहेत.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती यू यू ललित (justice uu lalit) यांच्या नावाची शिफारस केली आहे. न्यायमूर्ती यू यू ललित हे भारताचे ४९ वे सरन्यायाधीश असतील. सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत. निवृत्तीनंतर न्यायमूर्ती यू यू ललित हे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील.

न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांनी जून १९८३ मध्ये प्रॅक्टिस सुरू केली. १९८३ ते १९८५ या काळात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Supreme Court) प्रॅक्टिस केली. यू यू ललित यांनी १९८६ ते १९९२ या काळात माजी ऍटर्नी जनरल सोली सोराबजी यांच्यासोबतही काम केले आहे. २००४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांची वरिष्ठ वकील म्हणून शिफारस केली.

न्यायमूर्ती यू यू ललित हे क्रिमिनल कायद्याचे तज्ज्ञ आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व 2G खटल्यांमध्ये त्यांनी सीबीआयचे सरकारी वकील म्हणून प्रकरणांमध्ये भाग घेतला. याशिवाय त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) विधी सेवा समितीचे सदस्य म्हणूनही दोन वेळा काम केले आहे.

१३ ऑगस्ट २०१४ रोजी त्यांची बारमधून थेट सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली. त्यानंतर मे २०२१ मध्ये त्यांची राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

२०१४ मध्ये त्यांनी याकुब मेननच्या याचिकेवर सुनावणी करण्यापासून स्वत:ला दूर ठेवले. १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील मेननची फाशीची शिक्षा कायम ठेवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा पुनर्विलोकन करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती.

२०१५ मध्ये, त्यांनी २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोटात निष्पक्ष खटला चालवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेच्या सुनावणीपासून स्वतःला दूर ठेवले.२०१६ मध्ये, आसाराम बापू खटल्यातील मुख्य फिर्यादी साक्षीदार बेपत्ता झाल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेच्या सुनावणीपासून त्यांनी स्वतःला दूर ठेवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti: अजित पवारांच्या आमदाराकडून काँग्रेसचा प्रचार, महायुतीतील संघर्ष टोकाला

Chanakya niti: दुपारच्या वेळेस का झोपू नये? चाणक्यांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Maharashtra Politics: एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वादामुळे माझं सँडविच होतं, रक्षा खडसे असं का म्हणाल्या?

Viral Video : गाड्या अडवल्या, बोनेटवर बसून धिंगाणा घातला; साताऱ्यात मद्यपी तरुणीचा धिंगाणा, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT