दलाई लामा Saam Tv
देश विदेश

दलाई लामांचा उत्तराधिकारी कोण?; चिन सरकार बदल करण्यावर ठाम

बौद्धांची शिकवण आंतरराष्ट्रीय समुदायापर्यंत नेण्यात दलाई लामांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तिबेटचे विद्यमान अध्यात्मिक नेते तेन्झिन ग्यात्सो (14th Dalai Lama) 6 जुलै रोजी 86 वर्षांचे झाल्यामुळे तिबेटच्या पुढील दलाई लामांचा उत्तराधिकारी कोण हा प्रश्न चीन समोर उभा ठाकला आहे. दलाई लामांचा उत्तराधिकारी कोण असावा हा प्रश्ना आणखी अवघड होत चालला आहे. ब्रुक शेक्नेक यांनी एका वृत्तपत्रामध्ये लिहिले तिबेटमधील बौद्धांना तेन्झिन ग्यात्सोंचा पुनर्जन्म पाहिजे, परंतु चीन त्यांचा वारस निश्चित करण्याच्या विचारात आहे.

बौद्धांची शिकवण आंतरराष्ट्रीय समुदायापर्यंत नेण्यात दलाई लामांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. दलाई लामांचा वारसदार परंपरेने मठातील जेष्ठ शिष्य आध्यात्मिक चिन्हे आणि दृष्टांतांच्या आधारे ओळखला जातो.

तथापि, २०११ मध्ये चिनी परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of Foreign Affairs of the People's Republic of China) जाहीर केले की बीजिंगमधील सरकारच पुढील दलाई लामांची नियुक्ती करू शकते आणि इतर कोणत्याही उमेदवाराला मान्यता दिली जाऊ नये. दलाई लामा एक अत्यंत प्रभावी व्यक्ती आहेत आणि उत्तराधिकारी निवडणे केवळ धार्मिकच नाही तर राजकीय मुद्दा देखील आहे.

आज पुढील दलाई लामांसाठीची निवड प्रक्रिया अनिश्चित बनली आहे. चीनच्या कम्युनिस्ट सरकारने तिबेटवर आक्रमण करून कब्जा केला होता. त्यानंतर 1959 मध्ये दलाई लामा भारताला शरण आले आणि त्यांनी निर्वासित सरकारची स्थापना केली. दलाई लामा तिबेटी लोकांना पुजनीय आहेत. ज्यांनी शेवटच्या 70 वर्षांमध्ये चीनी राजवटीवर शासनावर विश्वास ठेवला आहे.

Edited By : Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने, गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT