Who is Sheikh Hasina Money Control
देश विदेश

Sheikh Hasina: आपला देश सोडून भारतात शरण घेणाऱ्या शेख हसीना कोण आहेत?

Who is Sheikh Hasina: शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भारतात शरण घेतलंय. ज्या पंतप्रधानांनी देशात लष्करी राजवटी काढून फेकली होती. आज त्यांनाच देश सोडून पळून जावे लागले आहे.

Bharat Jadhav

काही दिवासांपासून सुरू असलेल्या हिंसाचारामुळे अडचणीत आलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना आपला देश सोडावा लागलाय. बांगलादेशमधील अस्थिर परिस्थितीमुळे त्यांनी राजीनामा दिला असून त्यांना आपला देश सोडावा लागलाय. एकेकाळी त्यांनी देशात लष्कर राजवट लागू दिली नाही. परंतु त्यांच्या कार्यकाळात त्यांना देशातून पळ काढावा लागलाय.

शेख हसीना यांनी एकेकाळी बांगलादेशला लष्करी राजवटीतून सोडविण्यास मदत केली होती, परंतु सत्तेत असताना त्यांच्या राजकीय विरोधकांची मोठ्या प्रमाणावर अटक करण्यात आली. त्यांच्या कार्यकाळात सुरक्षा दलांविरुद्ध मानवाधिकारावर निर्बंध दिसले. नागरी सेवा नोकऱ्यांच्या कोट्याच्या विरोधात विद्यापीठाच्या विद्यार्थी आंदोलन करत आहेत. जुलैपासून तेथील विद्यार्थी सरकारच्या निर्णयाविरोधात मोर्च काढत आहेत. शेख हसीना यांच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात देशात अशांतता निर्माण झालीय. त्यामुळे विरोधकांनी तिच्या राजीनाम्याची मागणी केलीय.

पोलीस आणि सरकार समर्थक विद्यार्थी गटांद्वारे निदर्शकांवर हल्ले होईपर्यंत हे आंदोलन शांतेत चालू होते. आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडावा लागला.

कोण आहेत शेख हसीना

गेल्या वर्षी तिने संपूर्ण बांगलादेशाला "समृद्ध आणि विकसित देश" बनवण्याचे वचन दिले होते. मात्र सरकारी आकडेवारीनुसार सुमारे १८ दशलक्ष तरुण बांगलादेशी कामापासून वंचित आहेत. याच तरुणांनी सरकारविरोधात आंदोलन पुकारले आहे.

76 वर्षीय शेख हसीना यांनी जानेवारीमध्ये पंतप्रधान म्हणून पाचव्यांदा विजय मिळवला होता. विरोधकांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. विरोधकाच्या मते, या निवडणुका योग्य प्रकारे झाले नसल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी हसीना यांनी मुख्य विरोधी पक्षाला "दहशतवादी संघटना" असे संबोधले होते. दरम्यान शेख हसीना यांच्या सरकारवर विरोधी कार्यकर्त्यांच्या हत्येसह अधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप केलाय.

शेख हसीना ह्याचे वडील क्रांतिकारी होते. त्यांनी बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काम केलं होतं. हसीना ह्यांनी बांगलादेशचं प्रतिनिधीत्व केलं होतं. त्यावेळी बांगला देशावर मोठं कर्ज होतं. अमेरिकेचे राजकारणी हेन्री किसिंजर यांनी हे कर्ज रद्द केलं होतं. बांगलादेशात १९७५ मध्ये सत्तापालट केलं जात होतं त्यावेळी शेख हसीना २७ वर्षांच्या होत्या. त्यावेळी लष्करी अधिकाऱ्यांनी तिचे वडील, पंतप्रधान शेख मुजीबुर रहमान, त्यांच्या आई आणि तीन भावांची हत्या केली होती. त्यावेळी ते परदेशात प्रवास करत होत्या. त्यांच्या वडिलांच्या अवामी लीग पक्षाचं नेतृत्त्व घेण्याआधी त्या सहा वर्षे वनवासात राहिल्या. त्यानंतर त्या परत आल्या आणि दशकभर चाललेल्या संघर्षाला सुरुवात झाली. त्यांना दीर्घकाळापर्यंत नजरकैदेत राहावे लागले होते.

त्यानंतर १९९० मध्ये लष्करी हुकूमशहा हुसेन मुहम्मद एरशाद यांना पदच्युत करण्यासाठी हसीना यांनी खालिदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) सोबत युती केली. परंतु त्यांची ही युती जास्त वेळ चालू शकली नाही. आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्याने बांगलादेशात सत्ता स्थापन केली. हसीना यांनी १९९६ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या. परंतु पाच वर्षांनी झिया यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. त्यानंतर झिया सरकारने शेख हसीना यांना २००७ मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात टाकले होते.

त्यानंतर त्यांच्यावरील आरोप वगळण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी पुढील वर्षी निवडणूक लढवली. तेव्हा हसीना प्रचंड मतांनी विजयी झाल्या आणि तेव्हापासून सत्तेत त्या आहेत. त्यानंतर हसीना यांनी ७८ वर्षीय झिया यांना लाचलुचपतच्या आरोपांवरुन २०१८ मध्ये १७ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यांच्या पक्षातील प्रमुख नेतेही तुरुंगात होते.

कधीकाळी आर्थिक संकटात सापडलेल्या बांगलादेशाला शेख हसीना यांनी देशात आर्थिक भरभराट आणली होती.बांगलादेशला उल्लेखनीय आर्थिक भरभराटीचे नेतृत्व केल्याबद्दल समर्थकांकडून हसीना यांचे कौतुक देखील केले गेलें. मुख्यत्वे त्यांच्या कपड्यांच्या निर्यात उद्योगाला शक्ती त्यांनी प्रोत्साहन दिलं होतं. १९७१ मध्ये पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक असलेल्या बांगलादेशने २००९ पासून दरवर्षी सरासरी ६ टक्क्यांहून अधिक वाढ केलीय. गरिबी कमी झाली आहे आणि देशातील १७० दशलक्ष लोकांपैकी ९५ टक्क्यांहून अधिक लोकांना आता वीज उपलब्ध रहोत आहे. दरडोई उत्पन्नाने २०२१ मध्ये भारताला मागे टाकले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT