Rahul Gandhi Latest Video Youtube Saam Tv
देश विदेश

Rahul Gandhi Viral Video: कोण आहे राहुल गांधींची क्रश, लग्न कधी करणार? स्वतःवर बनवलेल्या मीम्सवरही दिलं उत्तर

Rahul Gandhi Latest Video: कोण आहे राहुल गांधींची क्रश, लग्न कधी करणार? स्वतःवर बनवलेल्या मीम्सवरही दिलं उत्तर

Satish Kengar

Rahul Gandhi on His Memes:

राहुल गांधी लग्न कधी करणार? त्यांची कॉलेज क्रश कोण? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात येत असतात. आता खुद्द राहुल गांधींनी या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. हे प्रश्न काही महाविद्यालयीन तरुणींनी राहुल गांधींना विचारले होते.

या प्रश्नांची उत्तरेही राहुल गांधींनी अतिशय मजेशीर पद्धतीने दिली आहेत. इतकेच नाही तर या प्रश्नोत्तरादरम्यान राहुल गांधींनी आपल्याला कोणत्या तीन भाज्या आवडत नाहीत हेही सांगितले. या संवादाच्या शेवटी त्यांनी विद्यार्थिनींना जीवनाशी संबंधित काही टिप्सही दिल्या आहेत.

टाटा, बाय-बाय मीम्सवर काय म्हणाले?

यादरम्यान, एका मुलीने राहुल गांधींना विचारले की, आजकाल इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावर रिल्स आणि मीम्स खूप लोकप्रिय आहेत. तुमचा असाच एक मीम खूप व्हायरल झाला आहे, टाटा, बाय-बाय. यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी आधी हसले. मग ते म्हणतात की, कधीतरी असं करावं लागतं.

या संवादादरम्यान राहुल गांधींनी त्यांच्या आवडत्या खाद्यपदार्थाबाबतही चर्चा केली. राहुल गांधी म्हणाले की, त्यांना कारले, वाटाणे आणि पालक आवडत नाहीत.

राहुल गांधींसोबत शाळकरी मुलींचा हा संवाद राजस्थानच्या महाराणी कॉलेजमध्ये झाला. त्याचाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या संवादादरम्यान एका विद्यार्थ्याने राहुल यांना विचारले की, तुमच्या कॉलेजच्या क्रशचे नाव काय आहे? हा प्रश्न राहुल गांधींनी हसून टाळला. (Latest Marathi News)

यानंतर दुसर्‍या विद्यार्थ्याने विचारले की तुम्ही खूप सुंदर आणि हुशार आहेत...तुम्ही लग्न का केले नाही? यावर राहुल म्हणाले की, मी माझ्या कामात आणि काँग्रेसमध्ये अडकलो आहे. प्रश्नोत्तरांची मालिका इथेच थांबली नाही. दुसर्‍या विद्यार्थ्याने विचारले तुमचे आवडते पर्यटन स्थळ कोणते आहे? यावर ते म्हणाले की, ज्या ठिकाणी मी यापूर्वी गेलो नाही, अशा सर्व ठिकाणी मला भेट द्यायला आवडते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Rule: भावा,वारंवार चालान येणं चांगलं नव्हं! ड्रायव्हिंग लायसन्स होईल रद्द; जाणून घ्या नवीन नियम

Pune Shocking : पुणे हादरलं! आयटी इंजिनीअर तरुणाने कंपनीतच आयुष्य संपवलं, हिंजवडी आयटी पार्कात खळबळ

Maharashtra Live News Update: भर दिवसा धाडसी चोरी चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Ind vs Eng : मँचेस्टरमध्ये भारताचा पराभव कसा टळला? कॅप्टन शुभमन गिलनं सांगितला टर्निंग पॉइंट

Crime news: प्रायव्हेट पार्टला इजा अन् गळ्याला...; ५ वर्षीय चिमुकलीवर नराधमाकडून अत्याचार

SCROLL FOR NEXT