Krishna Madiga Tears PM Narendra Modi Saam Tv
देश विदेश

Who Is Krishna Madiga: भरसभेत मोदींच्या खांद्यावर डोकं ठेवून ढसाढसा रडले, कोण आहेत कृष्णा मडिगा?

Krishna Madiga Tears PM Narendra Modi: भरसभेत मोदींच्या खांद्यावर डोकं ठेवून ढसाढसा रडले, कोण आहेत कृष्णा मडिगा?

Satish Kengar

Krishna Madiga Tears PM Narendra Modi:

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज हैदराबादच्या सिकंदराबाद येथे पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत मंचावर असलेले माडिगा आरक्षण पोराटा समितीचे (एमआरपीएस) नेते मंदा कृष्णा मडिगा भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. मोदींच्या खांद्यावर डोकं ठेवून ते ढसाढसा रडल्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

कृष्णा मडिगा यांना अश्रू अनावर झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी मडिगा यांचा हात धरून त्यांचे सांत्वन केले. तेलुगू राज्यांतील अनुसूचित जातीच्या सर्वात मोठ्या घटकांपैकी एक असलेल्या माडिगा समाजाच्या संघटना असलेल्या माडिगा आरक्षण पोराटा समितीने आयोजित केलेल्या सभेला संबोधित करण्यासाठी पंतप्रधान मोदी तेथे पोहोचले होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंतप्रधान मोदी हात जोडून उभे राहिले, तेव्हा कृष्णा मडिगा म्हणाले, 'आजपर्यंत कोणत्याही पंतप्रधानाने मडिगांच्या बैठकीत भाग घेतला नाही.' दरम्यान, मडिगा आरक्षण पोराटा समिती अनुसूचित जाती समुदायासाठी आरक्षणाचे उप-वर्गीकरण करण्याची मागणी करत आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून ही मागणी केली जात आहे. (Latest Marathi News)

पंतप्रधान मोदी नवी दिल्लीहून विशेष विमानाने बेगमपेट विमानतळावर पोहोचले होते. विमानतळावर सरकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. त्यानंतर मोदी रस्त्याने परेड मैदानाकडे रवाना झाले. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे परेड ग्राऊंडच्या आजूबाजूच्या काही भागात वाहतूक निर्बंधांसह विस्तृत सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती.

कोण आहेत कृष्णा मडिगा?

कृष्णा मडिगा समाजाच्या हक्कांसाठी लढण्यासाठी ओळखले जातात. राजकारणी आणि समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. माडिगा आरक्षण पोराटा समितीची स्थापना 1994 मध्ये झाली. त्यांनी जातीभेद, मुलांचे आरोग्य, अपंगत्वाचे हक्क असे मुद्दे मांडले असून त्यासाठी आंदोलन ही केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT