Indian Army Air Force and neavy  Saam Tv News
देश विदेश

युद्धनौका सज्ज, पाकिस्तानची हवा निघाली; भारताकडे कोणकोणते विध्वसंक शस्त्र? तुम्ही नावं तर वाचा फक्त...

Indian Defence : भारताच्या सरंक्षण क्षेत्राला शस्त्र सज्जता मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. अशातच राफेल मरीनच्या खरेदीसाठी फ्रान्ससोबत भारतानं करार केलाय.

Prashant Patil

नवी दिल्ली : भारताच्या सरंक्षण क्षेत्राला शस्त्र सज्जता मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. अशातच राफेल मरीनच्या खरेदीसाठी फ्रान्ससोबत भारतानं करार केलाय. मात्र राफेल एमसह इतरही शस्त्रास्त्रांनी भारताची ताकद वाढवलीय. ती कशी? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी वेगानं काम सुरु केलयं. त्यात भारत फ्रान्ससोबत करार करून राफेल एम खरेदी करणारये. मात्र राफेल मरिनपेक्षा विध्वसंक फायटर जेट आणि शस्त्र भारताकडे आहेत. नौदल, भारतीय लष्कर आणि हवाई दल यांची शस्त्र सज्जता परकीय सत्तांना अंचिबत करणारी आहे. त्यामुळे भारताकडील विध्वसंक शस्त्र कोणती जाणून घेऊया.

1) तेजस MK1A फायटर जेट

लांबून शत्रूवर हल्ला करण्यास सक्षम

हवेत इंधन भरण्याची क्षमता, मिशन कालवधी वाढवण्यास उपयुक्त

2) प्रोजेक्ट 17 ब्राव्हो युद्धनौका

जमिनीवरून हवेत मारा करण्यास सक्षम

शत्रूच्या रडारपासून संरक्षण करण्यास मदत

3) आयएनएस वागशीर पाणबुडी

खोल महासागरात लक्ष्यांचा मागोवा घेण्यास सक्षम

लांब पल्ल्याच्या मोहिमांसाठी योग्य

हिंदी महासागरात गस्त घालण्यासाठी फायदेशीर

4) राफेल एम (मरीन)

हवेतून हवेत, हवेतून जमिनीवर आणि हवेतून समुद्रात मारा करण्यास सक्षम

नौदलाची हवाई शक्ती वाढवणारे राफेल

या फायटर जेट्स आणि युद्धनौकांमुळे भारताच्या तिन्ही दलांची शक्ती वाढलीय. त्यामुळे भारत-पाकिस्तान युद्ध झाल्यास ही क्षेपणास्त्र पाकचा खेळ खल्लास करतील. त्यामुळे भारतानं शस्त्र सज्जता वाढवण्यावर दिलेला भर पाकिस्तानची कोंडी हवा, पाणी, जमिन यापैकी नेमकं कोणत्या मार्गानं करतो हे पाहण्याची उत्सुकता निर्माण करणारये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: टिटवाळातील काळूनदीत २ बहिणींचा बुडून मृत्यू

Smartphone Hanging: तुमचा फोन वारंवार हॅंग होतो का? मग 'या' टिप्स करा फॉलो

Balen Shah: Gen-Z क्रांती! कर्नाटकात शिक्षण, नंतर महापौर, प्रसिद्ध रॅपर नेपाळचा कारभार हाकणार?

Maharashtra Politics: मोठी उलथापालथ; ठाण्यात शिंदेंची राजकीय खेळी; भाजपच्या आठ शिलेदारांचा शिवसेनेत प्रवेश

RBI Vacancy 2025 : RBIमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! १० ऑगस्टपासून ऑफिसर पदासाठी भरती

SCROLL FOR NEXT