S. Jaishankar Saam TV
देश विदेश

रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी काय असणार भारताची भूमिका? एस जयशंकर यांनी स्पष्टच सांगितले

Russia Ukraine War : एस. जयशंकर यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी थेट चर्चा केल्याचा उल्लेख केला.

Namdeo Kumbhar

नवी दिल्ली : (Russia Ukraine War) रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध कसे थांबवावे यावर जगभर चर्चा सुरू आहे. मात्र, काही देशांव्यतिरिक्त इतर कोणत्याही देशाने यावर थेट बोलण्याची हिंमत दाखवलेली नाही, पण भारताने नेहमीच या युद्धाला थांबवण्यासाठी ठाम भूमिका घेतली आहे. याबाबत आता भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट शब्दांत जागतिक समुदायासमोर भारताची भूमिका मांडली आहे.

काय आहे भारताची भूमिका?

दोहा फोरममध्ये भारताने रशिया-युक्रेन युद्ध आणि जागतिक संघर्षांबाबत आपली सक्रिय भूमिका स्पष्ट केली. एस. जयशंकर यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी थेट चर्चा केल्याचा उल्लेख केला. त्यांनी खाडी देश आणि भूमध्यसागरी भागांतील तणावांवरही चर्चा केली. त्यांनी आशा व्यक्त केली की चर्चेच्या माध्यमातून या समस्येचे समाधान निघू शकते.

परदेशी भूमीवर जयशंकर यांची ठाम भूमिका

दोहा फोरममध्ये सहभागी होताना एस. जयशंकर यांनी अधिक नावीन्यपूर्ण आणि सहभागात्मक राजनैतिक दृष्टिकोनाची गरज व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, युद्ध चालू ठेवण्याऐवजी चर्चेच्या दिशेने प्रगती होत आहे. कतरचे पंतप्रधान आणि परराष्ट्र राज्यमंत्री मोहम्मद बिन अब्दुल रहमान यांच्या निमंत्रणावर जयशंकर दोहा दौऱ्यावर होते, जिथे त्यांनी भारताची भूमिका स्पष्टपणे मांडली.

भारताने युद्ध थांबवण्यासाठी काय केले आहे?

जयशंकर यांनी सांगितले की, भारताने पारदर्शक पद्धतीने रशियातील राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा केली आणि युक्रेनमध्ये जाऊन राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी संवाद साधला. भारत सामाईक सूत्र शोधत आहे, ज्याद्वारे दोन देशांमध्ये संवाद साधता येईल. त्यांनी ग्लोबल साऊथ मधील देशांचे प्रतिनिधित्व करताना सांगितले की, युद्धामुळे या देशांवर इंधन, अन्न, खत यांचे वाढलेले खर्च आणि महागाईचा मोठा परिणाम झाला आहे. ग्लोबल साऊथमध्ये प्रामुख्याने आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील देशांचा समावेश आहे.

युरोपीय नेत्यांनी केली विनंती

एस. जयशंकर यांनी सांगितले की, अनेक युरोपीय नेतेही भारताला रशिया आणि युक्रेनमधील चर्चेत सहभागी राहण्याची विनंती करत आहेत. त्यांनी सांगितले, गोष्टी चर्चेच्या दिशेने पुढे सरकत आहेत. भारताला जागतिक मंचावर शांतता स्थापनेसाठी महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shepu Batata Bhaji Recipe: पौष्टिक शेपू बटाटा भाजी कशी बनवायची?

प्रचारादरम्यान भाजपचा पैशांचा पाऊस, शिंदे गटाच्या नेत्यांनी रांगेहाथ पकडले, निवडणूक आयोगाचे पथक घटनास्थळी दाखल|VIDEO

Maharashtra Live News Update : लातूरमध्ये पैसे वाटपावरून भाजप पदाधिकारी आणि काँग्रेस उमेदवारामध्ये राडा

Pune Police: पुण्यात वाहतूक पोलिसाची आत्महत्या, सुसाईड नोटमधून धक्कादायक कारण समोर

Chanakya Niti: कर्ज घेण्यापूर्वी चाणक्यांचे हे 3 नियम जाणून घ्या; वाद आणि आर्थिक संकट टळेल

SCROLL FOR NEXT