Atiq Ahmed Last Words SAAM TV
देश विदेश

Atiq Ahmed Last Words : हत्येपूर्वी काय होते गँगस्टर अतिक अहमदचे शेवटचे शब्द?

Ashraf Ahmed Shot Dead: प्रयागराजमध्ये कुख्यात गँगस्टर अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची काल रात्री उशिरा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

Shivani Tichkule

Atiq Ahmed Case : प्रयागराजमध्ये कुख्यात गँगस्टर अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची काल रात्री उशिरा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. प्रयागराज येथील मेडिकल कॉलेजच्या बाहेरच ही घटना घडली. या दोघांनाही वैद्यकीय चाचणीसाठी नेत असताना अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली आहे. गोळीबार झाला तेव्हा अतिक आणि अशरफ दोघेही जागीच कोसळले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. (Latest Marathi News)

प्रयागराजच्या काल्विन हॉस्पिटलमध्ये (Hospital) दोघांना वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात येत होते. त्याचवेळी मीडियाच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते. त्यावेळी दुचाकीवरून मारेकरी आले. ते तिघेही रिपोर्टर बनून आले होते. त्यांनी पिस्तूल काढले आणि अतीक, अशरफ यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण घटनास्थळी पोलीस (Police) बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  (Breaking Marathi News)

'हे' होते अतिकचे शेवटचे शब्द...

माध्यम प्रतिनिधींनी अतिकला विचारलं की, तुम्हाला अंत्ययात्रेत नेलं नाही, याबद्दल तुम्हाला काही बोलायचं आहे का? अतिक म्हणाला," हा आम्हाला नेलं नाही. पण मुख्य गोष्ट ही आहे की..." बस यापुढे अतीक अहमद काही बोलणार तितक्यात त्याच्यावर आणि अशरफवर गोळ्या झाडण्यात आल्या. या दोघांवर ज्या गोळ्या झाडल्या त्यात या दोघांचा जागीच मृत्यू झाला. 

अतिक अहमद याचा मुलगा असद याचंही दोन दिवसांपूर्वी एन्काऊंटर करण्यात आलं होतं. त्याचे अंत्यसंस्कार कडक पोलीस बंदोबस्तात पार पडले. या अंत्यसंस्काराला केवळ २५ लोक उपस्थित होते, तसंच ड्रोनद्वारे यावर नजर ठेवण्यात आली होती.

प्रयागराजमध्ये कलम १४४ लागू

या घटनेनंतर संपूर्ण उत्तर प्रदेश हादरला आहे. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तात्काळ पावले उचलली आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव प्रयागराजमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. प्रत्येक ठिकाणी गस्त आहे. तसेच परिसरात अलर्ट जारी केला आहे.

पोलिसांनी संवेदनशील ठिकाणांवर प्रचंड बंदोबस्त ठेवला आहे. आसपासच्या जिल्ह्यांतून पोलिसांचा फौजफाटा बोलावण्यात आला आहे.

दरम्यान, हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची चौकशी केली जात आहे. हे हल्लेखोर माध्यम प्रतिनिधी बनून आले होते अशी माहिती देण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: मुंबईसह ठाण्यात तुफान पाऊस, राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

कराचीत ५ मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली, २७ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

Chocolate Waffle Recipe : बिस्किटांपासून बनवा चॉकलेट वॉफल, लहान मुलांचा आवडता पदार्थ १० मिनिटांत तयार

10 Hour Work Rule: सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! १० तासांची शिफ्ट, ५ दिवसांचा आठवडा

SCROLL FOR NEXT