Sujay Vikhe Patil : व्यापाऱ्यावरील हल्ल्याच्या घटनेनंतर विखे पाटील अ‍ॅक्शन मोडवर; अनाधिकृत टपऱ्या JCB लावून काढणार

काही महिन्यांपूर्वी व्यापाऱ्यांनी अनधिकृत अतिक्रमणे काढावी यासाठी उपोषणही केले होते मात्र काही दिवसांनी हे अतिक्रमणे पुन्हा जैसे थे होतात.
Sujay Vikhe Patil
Sujay Vikhe PatilSaam Tv
Published On

सुशिल थोरात

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा गाजत असून शुक्रवारी बाजारपेठेतील दोन व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला होता. याआधी बाजारपेठेमध्ये अतिक्रमणावरून व्यापाऱ्यांवर हल्ले झाले आहेत.  (Latest Marathi News)

Sujay Vikhe Patil
Atiq Ahmed Latest News : योगी सरकार अॅक्शन मोडमध्ये, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश, पोलीस हायअलर्टवर

काही महिन्यांपूर्वी व्यापाऱ्यांनी अनधिकृत अतिक्रमणे काढावी यासाठी उपोषणही केले होते मात्र काही दिवसांनी हे अतिक्रमणे पुन्हा जैसे थे होतात. आता शुक्रवारी व्यापाऱ्यांवर झालेल्या हल्यानंतर हा मुद्दा पुन्हा गरम झाला आहे. अहमदनगर (Ahmednagar) शहरामध्ये एका कार्यक्रमात बोलताना अहमदनगर दक्षिणचे खासदार विखे पाटील (Sujay Vikhe Patil) हा मुद्दा धरून याला जबाबदार महाविकास आघाडी असल्याचे सांगितले.

मागच्या तीन वर्षाच्या महाविकास आघाडीच्या कालावधीत सरकारी यंत्रणेला गंज लागलेला आहे. हा गंज पुसून गुन्हेगाराचा बंदोबस्त करण्याची वेळ आपल्यावर आली आहे. पुढच्या दहा दिवसांमध्ये या नगर शहरात जेवढे गुंड आहेत. जेवढ्या लोकांनी अनाधिकृत टपऱ्या दुकाने लावून अतिक्रमणे केलेली आहेत ते सर्व आम्ही जेसीबी लावून काढणार आहोत असं वक्तव्य अहमदनगर दक्षिणचे भाजपचे (BJP) खासदार सुजय विखे पाटील यांनी केले आहे.

Sujay Vikhe Patil
Navi Mumbai Crime: भयंकर! मद्यधुंद कारचालकाने वाहतूक पोलिसाला १२ किलोमीटर फरफटत नेलं; थरकाप उडवणारा VIDEO

तसेच पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, ज्याप्रमाणे सध्या व्यापाऱ्यांवर दहशत सुरू आहे त्यावरून उद्या आपल्या मुली रस्त्यावरून कॉलेजला जाऊ शकणार नाही मुलींना महिलेला सुरक्षा देणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधी च काम आहे. मात्र महाविकास आघाडीच्या एकाही नेत्यांनी याबाबत कधी एक शब्दही उच्चारला नाही, असं वक्तव्य ही खासदार सुजय विखे पाटील यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com