Atiq Ahmed Latest News : योगी सरकार अॅक्शन मोडमध्ये, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश, पोलीस हायअलर्टवर

Atiq Ahmed Latest News : गँगस्टर अतीक अहमद याच्या हत्येच्या घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकारने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
Atiq Ahmed Latest News
Atiq Ahmed Latest NewsSAAM tv
Published On

Atiq Ahmed Latest News : कुख्यात गँगस्टर अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची मीडियाशी बोलताना हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केल्याची घटना घडल्यानंतर उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशात खळबळ माजली आहे. या घटनेनंतर उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांचे सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.  (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, अतीक अहमद आणि अशरफच्या सुरक्षेत तैनात असलेल्या पोलिसांवर कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारी निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

प्रयागराजच्या घटनेनंतर लखनऊ पोलीस हायअलर्टवर आहेत. पोलिसांनी जुन्या लखनऊच्या हुसैनाबादमध्ये लोकांशी संवाद साधून गर्दी करू नये, अशा सूचना दिल्या आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले न्यायालयीन चौकशीचे आदेश

अतीक अहमद आणि अशरफ अहमद यांच्या हत्येच्या घटनेची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी तात्काळ उच्चस्तरीय बैठक बोलावली. या संपूर्ण घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी या घटनेच्या न्यायालयीन चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, तीन हल्लेखोरांना घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.(Breaking Marathi News)

Atiq Ahmed Latest News
Atiq Ahmed Last Video : मीडियाच्या कॅमेऱ्यासमोरच अतीक अहमद, अशरफला गोळ्या घातल्या; त्यानंतर सरेंडर, अवघ्या ३ सेकंदात हादरला प्रयागराज

प्रयागराजमध्ये कलम १४४ लागू

या घटनेनंतर संपूर्ण उत्तर प्रदेश हादरला आहे. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तात्काळ पावले उचलली आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव प्रयागराजमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. प्रत्येक ठिकाणी गस्त आहे. तसेच परिसरात अलर्ट जारी केला आहे.

पोलिसांनी संवेदनशील ठिकाणांवर प्रचंड बंदोबस्त ठेवला आहे. आसपासच्या जिल्ह्यांतून पोलिसांचा फौजफाटा बोलावण्यात आला आहे.

दरम्यान, हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची चौकशी केली जात आहे. हे हल्लेखोर माध्यम प्रतिनिधी बनून आले होते अशी माहिती देण्यात येत आहे.

Atiq Ahmed Latest News
Atique Ahmed Life Imprisonment: अतीक अहमदच्या पापाचा घडा भरला; उमेश पाल अपहरण प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com