Google Play Store News, Latest tech news in Marathi Saam Tv
देश विदेश

Google Search: गुगलवर भारतीयांनी यावर्षी सर्वाधिक काय सर्च केलं? लोकांना तसल्या शब्दांमध्ये इंटरेस्ट

लोकांनी कोरोनाबद्दल बनवलेल्या CoWin या साइटला सर्वाधिक सर्च केलं गेलं.

साम टिव्ही ब्युरो

Google Search List: गुगलने Google Year in Search 2022ची यादी जारी केली आहे. म्हणजेच यावर्षी गुगलवर सर्वात जास्त काय सर्च केले गेले याची माहिती कंपनीने दिली आहे. गुगल इयर इन सर्च 2022 मध्ये, IPLला सर्वाधिक सर्च करण्यात आले.

यानंतर लोकांनी कोरोनाबद्दल बनवलेल्या CoWin या साइटला सर्वाधिक सर्च केलं गेलं. भारतातील लोकांनी फिफा वर्ल्ड कप आणि आशिया कप टॉपिक देखील प्रचंड सर्च केले. (Technology)

'What is' सेक्शनमध्ये अग्निपथ योजना सर्वाधिक शोधली गेली. लोकांनी NATO आणि NFT बद्दल देखील खूप शोध घेतला. 'How to' सेक्शनमध्ये लोकांनी कोरोना वॅक्सिन सर्टिफिकेट डाउनलोड करण्याच्या पद्धतीसाठी Google वर खूप शोधले. लोकांनी PTRC डाऊनलोड करण्याची पद्धतही मोठ्या प्रमाणात सर्च केली.

मुव्ही सेक्शनमध्ये ब्रह्मास्त्र सिनेमाबाबत यूजर्सनी सर्वाधिक सर्च केले. तर K.G.F: Chapter 2 आणि The Kashmir Files दुसऱ्या, तिसऱ्या स्थानावर राहिले. चौथ्या स्थानावर RRR आणि 5व्या स्थानावर कांतारा लोकांना सर्च केलं. (Latest Marathi News)

न्यूज सेक्शनमध्ये लोकांनी लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल सर्वाधिक सर्च केलं. सिद्धू मूसेवालाच्या हत्येसंबंधी बातम्यादेखील लोकांनू खूप सर्च केल्या. या यादीत रशिया-युक्रेन युद्ध तिसऱ्या क्रमांकावर होते.

रेसिपीमध्ये लोकांनी पनीर पसंदा सर्वात जास्त शोधला गेला. या यादीत मोदक दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर सेक्स ऑन द बीच तिसऱ्या स्थानावर आहे. सेक् ऑन द बीच हे एक कॉकटेल आहे. यामध्ये वोडका, पीच स्नॅप्स, संत्र्याचा रस आणि क्रॅनबेरीचा रस यांचा समावेश आहे.

Near Me सेक्शनमध्ये Covid Vaccine near me सर्वात जास्त शोधलं गेलं. तर या यादीत Swimming Pool Near me दुसऱ्या क्रमांकावर आणि Water Park near me तिसर्‍या क्रमांकावर राहिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

Abhijeet Khandkekar Wife: फेसबुकवर मैत्री नंतर लग्न केलं; कोण आहे अभिजीत खांडकेकरची पत्नी?

SCROLL FOR NEXT