Wayanad landslides Saam Tv
देश विदेश

Wayanad landslides: वायनाडमध्ये विध्वंस का झाला? भूसख्खलन होण्यामागे कारण काय? वाचा सविस्तर

Rohini Gudaghe

मुंबई : केरळ राज्यातील वायनाडमध्ये ३० जुलै रोजी निसर्गाचा कहर पाहायला मिळाला. साखरझोपेत असलेली चार गावे जमीनदोस्त झाल्याचं समोर आलं. वायनाडमध्ये मुसळधार पावसानंतर निसर्गाचा कोप पाहायला मिळाला. हा विध्वंस सर्वांनाच अनपेक्षित होता, पहाटे झालेल्या भूसख्खलनामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झालाय, तर अनेकजण जखमी झाले आहेत. आज या घटनेला पाच दिवस पूर्ण झाले आहेत, तरीही घटनास्थळी बचावकार्य सुरूच आहे. वायनाडमध्ये विध्वंस का झाला? भूसख्खलन होण्यामागे कारण काय? अशी अनेक प्रश्न समोर येत आहेत. आपण वायनाड भूसख्खलन होण्यामागील कारण जाणून घेवू या.

वायनाडमध्ये विध्वंस का झाला?

वायनाडमध्ये भूसख्खलन झाल्यानंतर सर्वांच्याच पायाखालची जमिन सरकली. या विध्वंसाला जबाबदार कोण? हाच प्रश्न सर्वांना पडला आहे. वायनाडमध्ये झालेली बेसुमार जंगलतोड, अनियोजित बांधकाम, हवामानातील बदल आणि वाढता मानवी हस्तक्षेप ही भूसख्खलनाची प्रमुख कारणे आहेत, असं भूवैज्ञानिक आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीज, बेंगळुरू येथील सहायक प्राध्यापक सी.पी. राजेंद्रन यांनी 'द हिंदू' या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. संपूर्ण राज्यचं आपत्तीच्या सावटाखाली असल्याचं त्यांनी (What Is Reason Of Wayanad landslides) म्हटलंय.

भूसख्खलनाचं कारण काय?

केरळमध्ये १९८० च्या दशकात वृक्षलागवड करण्यासाठी जमीन मोकळी करण्यासाठी जंगलतोड करण्यात येत (Wayanad landslides Reason) होते. त्यामुळे या प्रदेशातील मातीची स्थिती बदलली. यामुोळे झाडांची मूळ व्यवस्था कुजली. यामुळे जमिनीत प्रचंड पोकळी निर्माण झाली होती. या पोकळ्यांमध्ये पाणी शिरले आणि मातीच्या पोकळ्या जमिनीखाली एकमेकींना जोडल्या गेल्या. मातीच्या आच्छादनाखाली पोकळी असलेली अशीच मातीची परिस्थिती मुंडक्काई आणि चूरलमाला परिसरात निर्माण झाली होती.

भूवैज्ञानिक काय म्हणतात?

मुंडक्काईपासून सुमारे ५ किमी अंतरावर असलेल्या कल्लाडी येथून नोंदवलेल्या पर्जन्यमापक (What Is landslides) डेटानुसार, मागील ३० दिवसांत या भागात सरासरी १८३० मिमी पाऊस पडला. निर्माण झालेल्या मातीच्या पोकळीत पाणी शिरल्यामुळे विध्वंस घडल्याचा अंदाज भूवैज्ञानिकांनी वर्तवविला आहे. यासोबतच अवैज्ञानिक बांधकाम पद्धती आणि उत्खनन देखील या धोक्याच्या उत्क्रांतीस कारणीभूत (Kerala Landslide) आहेत. वायनाडमधील सुमारे १०२ sqkm आणि १९६ sqkm क्षेत्र अनुक्रमे अत्यंत भूस्खलन प्रवण आणि मध्यम भूस्खलन प्रवण आहेत. तसेच काही स्थाने मातीच्या पोकळीच्या प्रभावासाठी असुरक्षित असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT