Mushroom Biryani : वीकेंड स्पेशल मेन्यू! अशी बनवा झणझणीत मशरूम बिर्याणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बिर्याणीचे साहित्य

१ पॅकेट मशरुम, १ इंच दालचीनी, २ ते ३ वेलची, १ काळी वेलची, ४-५ लवंग, २ ते ३ तेजपत्ता, अर्धा कप दही.

Mushroom Biryani | GOOGLE

साहित्य

१ ग्लास बासमती तांदूळ, २ मध्यम कापलेले कांदे, १ बारिक कापलेले टॉमेटो, १ स्टार फुल, १ चमचे जीरे, २ हिरव्या मिरच्या

Mushroom Biryani | GOOGLE

स्टेप १

सर्वात आधी तांदूळ धुवून ३ ते ४ तास भिजवत ठेवा. नंतर गरम पाण्यात गरम मसाले टाकून तांदुळ शिजवण्यास ठेवा. भात ७०% शिजवून घ्या.

Mushroom Biryani | GOOGLE

स्टेप २

बिर्याणी बेससाठी, एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात चिरलेला कांदा आणि आले-लसूण पेस्ट आणि संपूर्ण मसाले (जिरे, दोन्ही वेलची, लवंगा, दालचिनी, बडीशेप, तमालपत्र) घाला आणि परतून घ्या.

Mushroom Biryani | GOOGLE

स्टेप 3

आता टोमॅटो घाला आणि ते मऊ आणि गुळगुळीत होऊन द्या .मऊ झाले की, हिरव्या मिरच्या, लाल तिखट, बिर्याणी मसाला किंवा गरम मसाला घाला.

Mushroom Biryani | GOOGLE

स्टेप ४

दही घाला आणि मसाले पुन्हा ढवळून घ्या. पूर्णपणे एकत्र होईपर्यंत २-३ मिनिटे थांबा. चिरलेले मशरूम घाला आणि ४-५ मिनिटे परतून घ्या.

Mushroom Biryani | GOOGLE

स्टेप ५

आता, आर्धा शिजनलेला भात आणि पाणी घाला. मीठ टाका आणि सर्व मिश्रण चांगले मिक्स करा. झाकण ठेवून मध्यम आचेवर भात फुगून येईपर्यंत शिजवा.

Mushroom Biryani | GOOGLE

सर्व्ह करणे

स्वादिष्ट मशरूम बिर्याणी तयार आहे. रायत्याच्या वाटीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

Mushroom Biryani | GOOGLE

Potato Dishes : बटाट्यापासून तयार होणाऱ्या ५ चमचमीत डिशेस, वाचा झटपट रेसिपी

Potato Dishes | GOOGLE
येथे क्लिक करा