Pm Narendra Modi And Aamit Shah Saam tv
देश विदेश

Explainer : मुख्यमंत्री निवडीचा PM मोदी-अमित शहा यांचा फॉर्म्युला काय? भाजपच्या CM निवडीच्या बैठकीत नेमकी काय होते चर्चा?

Explainer BJP Political News: छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्री निवडीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यशैलीची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

Vishal Gangurde

BJP Latest Political News:

भाजपने छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री निवडीचा निर्णय घेतला आहे. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री निवडीबाबत भाजपचं धक्कातंत्र पाहायला मिळालं. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदावर मोहन यादव यांची निवड केली आहे. तर छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदी विष्णुदेव साय यांची निवड केली आहे. या दोन्ही निवडीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यशैलीची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

'आज तक'च्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशमध्ये शिवराज चौहान मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती. मात्र मध्य प्रदेशात मुख्यमंत्रिपदी मोहन यादव यांची निवड करण्यात आली आहे.

भाजपचे वरिष्ठ नेते निर्णय कसा घेतात?

भाजपचे वरिष्ठ नेते सध्या कोणत्याही दबावात निर्णय घेत नाही. भाजप नेते कोणताही निर्णय घेताना सर्वात आधी पक्षाचा विचार करतात. पक्षाचं हित डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय घेतात. भाजप नेते निर्णय घेताना कोणत्याही नेत्याचा दबावाला किंवा नेत्याचं शक्तीप्रदर्शन पाहून निर्णय घेत नाही,अशी माहिती मिळाली आहे.

'लाडली बहना योजने'ची चर्चा

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुबर दास, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री ताराकिशोर प्रसाद आणि उमा देवी यांचीही जनमानसात फारशी ओळख नव्हती. या नेत्यांना पक्षाने फार मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान यांच्या करिष्माऐवजी 'लाडली बहना योजने'ची जोरदार चर्चा होती.

देशातील जातीय समिकरण

भाजपचे वरिष्ठ नेते हे जातीय समिकरणाकडेही लक्ष देतात. ज्यांची जितकी संख्या, तेवढा त्यांचा हिस्सा' या घोषणेचं पालन भाजपकडून केलं जातं. मनोहर लाल खट्टर यांना हरियाणाचं मुख्यंत्री केलं आहे. कारण हरियाणात जाट समाजानंतर पंजाबी लोकांचं प्राबल्य आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ हे सर्व जातीमध्ये प्रिय आहेत. मात्र, त्यांना राजपूत नेते या चष्म्यातूनही पाहिलं जातात. उत्तर प्रदेशमध्ये एक उपमुख्यमंत्री बाह्मण समाजाचे आहेत. तर एक ओबीसी समाजाचे आहेत.

राष्ट्रपती पदाची निवड आणि राजकारण

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि विद्यमाान राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची निवड त्याच आधारे केल्याचं सांगण्यात येत आहे. द्रोपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच केली गेल्याचं सांगण्यात आलं आहे. जगदीप धनखड यांची उपराष्ट्रपतीपदी निवड राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील जाट समुदायांची मते डोळ्यांसमोर ठेवूनच केल्याचं सांगण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री ताकदवान नकोय, वरिष्ठ नेते मोदी-शहा पुरेसे आहेत

काँग्रेस पक्षात इंदिरा गांधी यांचा काळ होता. तोपर्यंत सर्व शक्ती एककेंद्रीत होत्या. तेव्हा कोणत्याही गटाला वर तोंड करण्याची ताकद नव्हती. इंदिरा गांधी यांच्यानंतर राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांचा काळापर्यंत अशीच परिस्थिती होती. मात्र राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या काळात पक्षाची पडझड पाहायला मिळाली. यामुळे काही राज्यात काँग्रेसला सत्ता गमवावी लागली आहे.

सत्ता येणाऱ्या राज्यात काँग्रेसने सत्ता गमावली. पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे नुकसान झालं. त्याचप्रमाणे इंदिरा गांधी युग आणि मोदी युग अशी तुलना केली जात आहे. त्यामुळे वरिष्ठाचा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

Abhijeet Khandkekar Wife: फेसबुकवर मैत्री नंतर लग्न केलं; कोण आहे अभिजीत खांडकेकरची पत्नी?

SCROLL FOR NEXT