what is a cluster bomb weapon  Saam
देश विदेश

Iran Israel Conflict : इराणच्या एका क्षेपणास्त्रात ८० बॉम्ब, इस्रायलवर मोठा प्रहार, क्लस्टर बॉम्ब नेमका काय आहे?

what is a cluster bomb weapon : इराणने इस्रायलवर क्लस्टर बॉम्ब असलेल्या क्षेपणास्त्राने हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे. एका क्षेपणास्त्रातून तब्बल ८० छोटे बॉम्ब बाहेर पडतात. क्लस्टर बॉम्ब किती धोकादायक आहेत आणि त्यावर अनेक देशांनी बंदी का घातली आहे, याची सविस्तर माहिती जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

Iran Israel conflict, cluster bomb attack : इराणनं इस्रायलवर भयंकर अशा क्लस्टर बॉम्बचा हल्ला केलाय...मात्र क्लस्टर बॉम्ब किती विध्वंसक आहे... आणि या बॉम्बमुळे इराणची शस्त्रसज्जता कशी वाढलीय.. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

इराणनं इस्त्रायल-अमेरिकेला अक्षरशः जेरीस आणलंय. इराणच्या अनपेक्षित प्रतिकारानं अमेरिकेलाही बुचकळ्यात टाकलंय. कारण इराण दररोज हल्ल्याची नवनवीन रणनीती आखत आहे. आता तर इराणनं आपल्या भात्यातलं नवं शस्त्र बाहेर काढलंय. आणि हे आहे क्लस्टर बॉम्ब...इराणनं इस्रायलवर थेट क्लस्टर बॉम्बचा हल्ला चढवलाय़. त्यामुळे युद्धाची धग कमी होण्याऐवजी आणखीनच वाढलीय. इराणनं थेट या क्लस्टर बॉम्ब हल्ल्याचा व्हिडिओ जारी केलाय.

इराणनं इस्त्रायलविरोधात वापरलेला क्लस्टर बॉम्ब नेमका काय आहे, हे ते पाहूयात...

काय आहे क्लस्टर बॉम्ब? -

क्लस्टर बॉम्ब हे क्षेपणास्त्राद्वारे डागले जातात

क्षेपणास्त्र जमिनीवर आदळण्यापूर्वीच हवेतच फुटतं

त्यातून 80 बॉम्ब बाहेर फेकले जातात

महत्त्वाचं म्हणजे, इराणकडून क्लस्टर बॉम्ब वापरण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधी इराणनं 19 जून 2025 ला इराणनं इस्रायलवर सुमारे २० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली होती, त्यातील एकामध्ये क्लस्टर बॉम्ब वॉरहेड होते. हे क्लस्टर बॉम्ब किची धोकादायक आहेत ते पाहूयात....

क्लस्टर बॉम्ब किती धोकादायक?

क्लस्टर बॉम्ब दीर्घकालीन परिणामांमुळे अत्यंत धोकादायक

एकाच क्षेपणास्त्राने सोडलेले 80 बॉम्ब तब्बल 10 किमी परिसराचं नुकसान करतात

क्लस्टर बॉम्बमध्ये अचूकता नसली तरी मोठं नुकसान करतात

क्लस्टर बॉम्बमुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असते.

120 हून अधिक देशांमध्ये क्लस्टर बॉम्ब वापरावर बंदी

खरं तर क्लस्टर बॉम्बमुळे इमारतींचे जास्त नुकसान होत नसलं तरी मनुष्यहानी मोठ्या प्रमाणावर होते, असा एका अहवालातून समोर आलंय. विशेष म्हणजे, क्लस्टर बॉम्बच्या वापरावर बंदी घातलेल्या 120 हून अधिक देशांमध्ये इस्रायल, अमेरिका आणि इराण या देशांचा समावेश नाहीये. त्यामुळे इराणनं याचाच फायदा उचलत इस्रायलवर क्लस्टर बॉम्बचा हल्ला चढवलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यातील रिंग रोड आणि महामार्गांना अजित पवारांचे नाव द्या,रोहित पवारांची मागणी

Zumba: वजन कमी करण्यासाठी झुंबा खरचं फायदेशीर आहे का?

SSC Exam : बोर्डाच्या कॉपीमुक्त परीक्षा मिशनचा फज्जा, दहावीचा पेपर ३ दिवस आधीच फोडला

LPG Crisis: जनता 'गॅस'वर, हॉटेल चुलीवर, हॉटेलला आता लाकडं, कोळशाचा आधार

Thursday Horoscope : मानसिक तणाव जाणवेल; ५ राशींच्या लोकांना वाणीवर संयम ठेवावा लागेल, अन्यथा...

SCROLL FOR NEXT