Crime News In Marathi Saamtv
देश विदेश

West Bengal Crime: शेवटची इच्छा 'रसगुल्ला'... जिवलग मित्राचे अपहरण करुन हत्या; १० वीतील मुलांचे भयंकर कृत्य

Crime News In Marathi: स्मार्ट वॉच आणि लॅपटॉप खरेदी करण्यासाठी १० वीतल्या विद्यार्थ्याने मित्राचे अपहरण केल्याचे उघडकीस आले.

Gangappa Pujari

West Bengal Crime: पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महागडा मोबाईल, स्मार्ट वॉच आणि लॅपटॉप खरेदी करण्यासाठी १० वीतल्या विद्यार्थ्याने मित्राचे अपहरण केल्याचे उघडकीस आले. पश्चिम बंगालच्या कृष्णनगरमध्ये ही खळबळजनक घटना घडली असून या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. (Crime News In Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मित्रांंनीच 'मित्राची' हत्या केल्याची घटना पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील कृष्णानगरमध्ये घडली. या प्रकरणात दहावीच्या तीन विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी घुर्णी येथील इयत्ता आठवीचा विद्यार्थी काही वस्तू घेण्यासाठी जवळच्या दुकानात गेला असताना बेपत्ता झाला होता.

शनिवारी सकाळी त्याच्या आईला तीन लाख रुपयांच्या खंडणीसाठी फोन आला. यानंतर मृताच्या आईने कोतवाली पोलीस ठाण्यात माहिती दिली. या प्रकरणात तीन अल्पवयी मुलांना पकडण्यात आल्यानंतर त्यांनी हत्येची कबूली दिली. (Crime Story)

१० वीत शिकणाऱ्या या तीन मुलांनी आठवीमध्ये शिकणाऱ्या त्यांच्याच मित्राचे अपहरण केले. इतकेच नव्हेतर या तिघांनी मुलाच्या आईला फोन करून तीन लाखांची खंडणीही मागितली. मात्र खंडणी न मिळाल्याने या तिघांनी मित्राची गळा दाबून हत्या केली. हत्येच्या आधी त्याला त्याची शेवटची इच्छा म्हणून रसगुल्ला आणि कोल्ड्रींक्सही दिले. प्रकरणी कोलकाता तीन किशोरवयीन मुलांना अटक केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

Maval Heavy Rain : मुसळधार पावसाचा तडाखा; मावळ झाले जलमय, अनेक गावांचा संपर्क तुटला

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, दोन नव्या मेट्रो स्थानकाला सरकारने दिली मंजुरी, वाचा सविस्तर

Reducing sweets: जगभरात 250 कोटी लोकं 'या' गंभीर आजाराशी झुंजतायत; आहारातील गोड कमी करणं ठरेल उपाय, WHO चा इशारा

Dance Viral Video : लुक लुक डोळे अन् मोतुले कान; 'बाप्पा येणार येणार' गाण्यावर चिमुकल्यांचा जबरदस्त डान्स

SCROLL FOR NEXT