West Bengal Waqf Act protest Saam Tv
देश विदेश

West Bengal Waqf Act protest: वक्फ कायद्याविरोधातील आंदोलनाला पश्चिम बंगालमध्ये हिंसक वळण, ३ जणांचा मृत्यू ; १५० जण अटकेत

Waqf Act: पश्चिम बंगालमध्ये वक्फ कायद्याविरोधात जोरदार आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला हिंसक वळण आले आहे. या हिंसाचारामध्ये आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला. तर याप्रकरणात आतापर्यंत १५० जणांना अटक करण्यात आली आहे.

Priya More

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या हिंसाचारात आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. मुर्शिदाबादच्या जांगीपूरमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून वक्फ कायद्याविरोधात जोरदार आंदोलनं सुरू आहेत. पण शुक्रवारपासून याठिकाणी परिस्थिती आणखी बिघडू लागली आहे. आज सकाळी पुन्हा याठिकाणी गोळीबार सुरू झाला आहे. या गोळीबारामध्ये दोन लहान मुलं जखमी झाले आहेत.

आज सकाळी मुर्शिदाबादमध्ये पुन्हा गोळीबार झाला. वक्फ कायद्याच्या निषेधार्थ पश्चिम बंगाल सध्या हिंसाचाराच्या आगीत पेटले आहे. मुर्शिदाबादमध्ये परिस्थिती आणखी तणावपूर्ण आहे. या हिंसाचारात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर शेकडो नारिक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. हिंसाचाराच्या घटनेत आतापर्यंत १३८ जणांना अटक करण्यात आली आहे. शनिवारनंतर रविवारी देखील याठिकाणी गोळीबार करण्यात आला. शनिवारी मुर्शिदाबादमध्ये हिंसाचारामुळे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलसांव्यतिरिक्त बीएसएफलाही तैनात करण्यात आले आहे.

मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनात शुक्रवारी दुपारनंतर तणाव आणखी वाढला. मुर्शिदाबादमध्ये तोडफोड, जाळपोळ आणि राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे वाहतूक रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. तणावाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बीएसएफ जवानांना तैनात करण्यात आले आहे. आतापर्यंत १५० हून अधिक जणांना हिंसाचार प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

वक्फ कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिस आमने-सामने आले आणि तणाव आणखी वाढला. शनिवारी सकाळपर्यंत तणाव नियंत्रणात होता पण त्यानंतर परिस्थिती बिकट झाली. धुलियानमध्ये एका व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. शुक्रवारी रात्री सुतीमध्ये एका अल्पवयीन मुलासह दोघांवर गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या हिंसाचारामध्ये जखमी झालेल्यांवर सध्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

हिंसाचारानंतर धुलियान आणि शमसेरगंजसह प्रमुख भागात अशांततेचे वातावरण आहे. मुस्लिम संघटना वक्फ कायद्याविरुद्ध सतत निदर्शने करत आहेत. शुक्रवारी मुर्शिदाबादमध्ये हिंसाचार झाला. तेव्हापासून परिस्थिती सतत तणावपूर्ण राहिली आहे. या निषेधाच्या दरम्यान शनिवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे एक विधानही समोर आले. त्यांनी म्हटले होते की, 'बंगालमध्ये वक्फ कायदा लागू केला जाणार नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT