Mamata Banerjee addresses party workers as speculation grows over possible defections and internal unrest within the Trinamool Congress. saam tv
देश विदेश

TMC Crisis: ममता बनर्जींना आणखी एक जबर धक्का; तब्बल २० खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

West Bengal Politics: बंडखोर आमदारांच्या लाटेमुळे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. टीएमसी खासदारांमध्ये उलथापालथीची चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किमान २० टीएमसी खासदार पक्ष बदलण्याच्या तयारीत आहेत.

Bharat Jadhav

  • तृणमूल काँग्रेसमध्ये बंडखोरीची चर्चा अधिक तीव्र झाली आहे.

  • जवळपास 20 खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

  • विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षातील असंतोष वाढल्याचे मानले जात आहे.

'घर फिरले की घराचे वासेही फिरतात' अशी म्हण तुम्ही वाचली असेल किंवा कोणाला उदाहरण कोणाला सांगितलं असेल. राजकीय वर्तुळात ही म्हण पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसला अगदी तंतोतंत लागू होते. विधानसभा निवडणुकीत पराभव होताच टीएमसीचे एक-एक आमदार,नगरसेवक पक्षातून बाहेर पडू लागले आहेत. आता टीएमसी खासदार सुद्धा पक्षातून बाहेर पडणार असल्याची शक्यता आहे. जवळपास २० खासदार पक्षाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा राज्यातील वर्तुळात सुरू आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. आता टीएमसीच्या आमदारांनी पुकारलेल्या बंडामुळे खासदारांमध्ये उडाली असून जवळपास २० खासदार पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या संदर्भात उच्च स्तरावर चर्चा सुरू असून खासदारांनी निष्ठेला मुठमाती देत पक्ष बदलण्याच्या निर्णयावर एकमत करण्याचा निर्धार केला आहे.

ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये तृणमूल काँग्रेसचे एकूण ४१ खासदार आहेत. यामध्ये लोकसभेतील २८ आणि राज्यसभेतील १३ खासदारांचा समावेश आहे. जर २० खासदारांनी टीएमसी सोडली, तर विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षातच बंडखोरीला सामोरे जाणाऱ्या ममता बॅनर्जी यांना हा आणखी एक मोठा धक्का असेन.

जर टीएमसीच्या खासदारांच्या गटात फूट पडली तर ही ममता बॅनर्जी यांचा हा मोठा पराभव असण्याची शक्यता आहे. कारण विरोधी पक्षामध्ये दुसरा मोठा पक्ष आहे. जर येथे बंडखोरी झाली तर टीएमसी आणि विरोधी पक्ष खूप कमकुवत होईल.

मात्र, बंगालमधील तृणमूल काँग्रेस (टीएमसी) विधिमंडळ पक्षात आधीच दोन गट पडले आहेत. आमदार ऋतब्रता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील ६० आमदारांच्या एका बंडखोर गटाने स्वतःलाच खरी तृणमूल काँग्रेस म्हणून घोषित केले आहे. या गटाने ऋतब्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली आहे. त्याला अध्यक्षांची मंजुरीही मिळवली आहे. या गटाने ममता बॅनर्जी यांच्या विरोधात उघडपणे बंड केले असून, विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांच्या निवडीला आव्हान दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : १९ राज्यांना वादळी वाऱ्यांसह पाऊस झोडपून काढणार, ८० किमी वेगाने वाहणार वारे; हवामान खात्याचा इशारा

Podi Idli Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी पोडी इडली, वाचा सोपी रेसिपी

Kolhapur : गावी नवीन घर बांधलं, ८ दिवस राहिले; दुसऱ्या गावी जाताना घडला भीषण अपघात, मुंबईतील एकाच कुटुंबातील चौघांचा करुण अंत

Maharashtra News Live Update: जगाला सध्या भारताची आवश्यकता: मोहन भागवत

नगरसेविका रेखा यादव यांच्याकडे दोन रेशन कार्ड, 3 मतदान कार्ड; काँग्रेसची चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT