Suvendu Adhikari Saam Tv
देश विदेश

West Bengal CM: मोठी बातमी! पश्चिम बंगालला मिळाले नवे मुख्यमंत्री, अमित शहांनी 'या' नेत्याच्या हाती सोपवली धुरा

West Bengal CM Suvendu Adhikari: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुवेंदू अधिकारी यांची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदी निवड केल्याची घोषणा केली. उद्या सकाळी ११ वाजता सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

Priya More
  • सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री

  • अमित शहा यांनी केली सुवेंदू अधिकारी यांच्या नावाची घोषणा

  • उद्या सकाळी ११ वाजता होणार शपथविधी

पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कोलकातामध्ये पार पडलेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. या बैठकीला भाजपचे सर्व नवनिर्वाचित २०६ आमदार उपस्थित होते. उद्या सकाळी ११ वाजता सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

कोलकातामध्ये भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अमित शहा यांनी सुवेंदू अधिकारी यांची पक्षाचे नेते म्हणून निवड केली. तसंच ते पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा देखील केली. सुवेंदू अधिकारी उद्या सकाळी ११ वाजता कोलकाताच्या ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राऊंडवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

९ मे हा दिवस पश्चिम बंगालसाठी खास दिवस राहिल. राज्यातील पहिल्या भाजप सरकारचा शपथविध सोहळा पार पडेल. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्री गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केला. भवानीपूर या ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्यातच सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला.

दरम्यान, पश्चिम बंगालचे राज्यपाल आर. एन.रवी यांनी ७ मे रोजी विधानसभा बरखास्त केली. कोलकाता गॅझेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या प्रचंड विजयानंतर हे विसर्जन करण्यात आले. विधानसभा बरखास्त केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपकडून सुवेंदू अधिकारी यांच्या नावाची मुख्यमंत्रिपदावर निवड करण्यात आली. अमित शहा यांनी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. थोड्याच वेळात सुवेंदू अधिकारी राज्यपालांची भेट घेणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought: राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर, वाचा

5 Chutney Recipe: कोणत्याही पदार्थासोबत खाता येतील अशा 5 सोप्या चटणी रेसिपी

Maharashtra News Live Update : पुण्यातील तिसऱ्या मानाच्या गणपतीचं विसर्जन

WhatsApp नंबर बदलताय? 'या' ५ चुका अजिबात करू नका; नाहीतर कायमचा गमावाल तुमचा महत्त्वाचा डेटा

October 2026 Rules : एलपीजी सिलेंडरपासून युपीआयपर्यंत, १ ऑक्टोबरपासून ५ मोठे नियम बदलणार; थेट तुमच्या बजेटवर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT