BJP leaders celebrate historic victory in West Bengal as discussions intensify over the next Chief Minister ahead of May 9 swearing-in. 
देश विदेश

West Bengal New CM: बंगालच्या गादीवर कोण बसणार? मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीवर मोठी अपडेट, तारीख आणि CM चं नाव आलं समोर

West Bengal Politics : पश्चिम बंगालमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा ९ मे रोजी होणार आहे. या सर्वोच्च पदासाठी सुवेंदू अधिकारी हे आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

Bharat Jadhav

  • पश्चिम बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय

  • ९ मे रोजी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी

  • सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर

पश्चिम बंगालच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. पश्चिम बंगालचे नवीन मुख्यमंत्री कोण होणार याचे नाव जवळपास निश्चित झाले आहे, याबाबतीच माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांनी एएनआयला दिली आहे. बंगालमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. येथे भाजपने २०६ जागा जिंकल्या आहेत. तर ममता बॅनर्जी यांचा टीएमसी पक्षाने ८० जागा जिंकल्या आहेत. यादरम्यान भाजपमधील पक्षश्रेष्ठी कोणाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

कधी होणार नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा?

हाती आलेल्या माहितीनुसार,ममता बॅनर्जी यांना पराभूत करणारे सुवेंदू अधिकारी हे बंगालचे पुढील मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. ९ मे हा रवींद्रनाथ टागोर यांचा जयंती दिवस आहे. भाजप अध्यक्षांच्या मते, त्या दिवशीच बंगालचे नवे मुख्यमंत्री शपथ घेतील. भाजप नेते आणि बंगाल पक्षाध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे.

दरम्यान पश्चिम बंगालमध्ये भाजप पहिल्यांदाच सरकार स्थापन करणार आहे. बंगालमधील विजयानंतरच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी रवींद्रनाथ टागोर यांचा उल्लेख केला. गुरुदेव टागोर यांच्या अजरामर ओळींमधील भावना व्यक्त करताना ते म्हणाले की, "जिथे मन भीतीमुक्त असेल आणि मान ताठ असेल" असा बंगाल घडवण्याचा भाजपचा संकल्प आहे. विजयानंतर पंतप्रधान मोदींनी भाजप कार्यालयाला भेट दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mental Health Tips : सतत उदास आणि निराश वाटतंय? या आजाराची आहेत ही गंभीर लक्षणे

Cancer Awareness : दररोज फक्त करा 'हा' एक व्यायाम कॅन्सर तुमच्यापासून राहील दूर; आजपासून करा सुरुवात

उपचारासाठी दर्ग्यात गेली, पण अत्याचाराला बळी पडली; मौलवीचा महिलेसोबत संतापजनक प्रकार

Monday Horoscope : सोमवार ठरणार भाग्याचा! ‘या’ 6 राशींना नोकरी-व्यवसायात मोठा फायदा; वाचा उद्याचे राशीभविष्य

Vangi Kaap: चपाती किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा कुरकुरीत आणि चविष्ट वांगी काप; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT