कोलकाता : पश्चिम बंगालमधून पुन्हा माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात एका १५ वर्षीय मुलीसोबत घृणास्पद प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री या घटनेवरून सरकार विरोधात रोष व्यक्त केला. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी अत्याचारानंतर मुलीला बेशुद्ध अवस्थेत रस्त्याच्या कोपऱ्याला फेकलं. ट्यूशनवरून घरी परतताना तिचं अपहरण करण्यात आल्याचंही उघडकीस आलं आहे.
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, मुलगी हरिपाल भागात बेशुद्ध अवस्थेत आढळली. यावेळी मुलीचे कपडे फाटलेले होते. या मुलीवर स्थानिक रुग्णालायत उपचार करण्यात आले आहेत. तसेच तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पश्चिम बंगाल पोलिसांनी सुरु केला आहे.
पोलिसांनी म्हटलं की, 'आम्हाला या प्रकरणात अद्याप कोणी संशियत आरोपी सापडलेला नाही. तपासादरम्यान कोणत्याही ठोस पुरावे मिळाले नाहीत. लोकांनी मुलगी आणि तिच्या कुटुंबीयाच्या गोपनीयतेचा आदर ठेवला पाहिजे. अफवा पसरवणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल'.
या घटनेनंतर पश्चिम बंगालमधील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस ही घटना लपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप भाजपने केला आहे. भाजप नेता अमिल मालवीय यांनी म्हटलं की, 'पश्चिम बंगालच्या पोलिसांनी रुग्णालायाला घेराव घातला आहे. माध्यमांना प्रवेश दिला जात नाहीये. स्थानिक टीएमसी नेत्यांनी या प्रकरणात शिरकाव केला आहे. ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. ममता बॅनर्जी महिला सुरक्षा करण्यास अपयशी ठरल्या आहेत. त्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे. त्यांनी अत्याचार आणि पॉक्सो प्रकरणासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट देखील तयार केलेले नाहीत'.
दरम्यान, कोलकाताच्या एका रुग्णालायातील महिला डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणावरून लोकांचा आक्रोश वाढू लागला आहे. ९ ऑगस्ट रोजी रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये ट्रेनी डॉक्टर अर्धनग्न अवस्थेत आढळली होती. या प्रकरणी आरोपी संजय रॉयला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.