fire  Saam tv
देश विदेश

West bengal News : गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, ७ जण दगावले, मृतांमध्ये ४ लहान मुलांचा समावेश

West bengal blast update : पश्चिम बंगालच्या ढोलाहाट परिसरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोटामुळे परिसरात खळबळ उडाली.

Vishal Gangurde

पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगना जिल्ह्याच्या ढोलाहाट येथील परिसरात भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात ७ जणांचा मृत्यू झालाय. घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर फटाक्यांचा स्फोट झाला. स्फोटामुळे घरांचं मोठं नुकसान झालं. भीषण स्फोटामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुंदरबनच्या ढोलाहाट येथील भागातील एका घरात स्फोट झाला. या घरातील कुटुंबीय अनेक वर्षांपासून फटाके बनवण्याचे काम करत होते. घरात एकूण ११ सदस्य होते. स्फोटानंतर ४ जण बेपत्ता आहेत. स्फोटानंतर घरातील फटाकांच्या राखेने पेट धरला. त्यानंतर भीषण स्फोट झाला. स्फोटाची दाहकता इतकी भीषण होती की, संपूर्ण घर उद्ध्वस्त झालं. घरात स्फोट झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.

स्फोटात सात जणांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे. स्फोट झाल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस दल घटनास्थळी पोहोचलं. त्यांनी तातडीने बचाव कार्य सुरु केलं.

नेमकी कशी घडली घटना?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नवरात्र पूजेसाठी घरात फटाके बनवले जात होते. सोमवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटात घराचं मोठं नुकसान झालं. काही लोकांच्या म्हणण्यानुसार, घरात जेवण बनवताना गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. आमदार समीर कुमार यांच्या म्हणण्यानुसार, फटाके तयार करताना अचानक स्फोट झाला. त्यानंतर संपूर्ण घराला आग लागली. घरात काही लोक होते. घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी पोहोचला.

स्थानिकांच्या माहितीनुसार, चंद्रकांत नावाच्या व्यक्तीच्या घरातून अचानक स्फोटाचा आवाज आला. काही वेळात घराला आग लागली. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं प्रयत्न सुरु आहेत. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! भाजपच्या दिग्गज नेत्याचा हरिद्वारमध्ये मृतदेह सापडला, राजकारणात खळबळ

ITR Filling 2026: आयटीआर फाइल करण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक; आताच तयार ठेवा, अन्यथा येईल अडचण

मुंबई ते नवी मुंबई विमानतळापर्यंत प्रवास जलद होणार; मेट्रो ८ च्या कामाला वेग, गोल्डन मार्गावर किती स्टेशन असणार?

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी

Health warning signs: किडनी आणि लिव्हर खराब झाल्यानंतर शरीरात दिसतात हे बदल; डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT