Mamata Banerjee on BJP News Update SAAM TV
देश विदेश

Mamata Banerjee: महाराष्ट्रावर कब्जा केला, पण पश्चिम बंगाल...; ममता बॅनर्जींचे भाजपला चॅलेंज

महाराष्ट्र ताब्यात घेतला, आता झारखंड ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असं त्या म्हणाल्या.

Nandkumar Joshi

कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पुन्हा भाजपवर हल्लाबोल केला. भाजप २०२४ मध्ये सत्तेत येणार नाही हे निश्चित आहे, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजपकडे काही काम नाही. तीन-चार एजन्सींच्या माध्यमातून राज्य सरकार आपल्या ताब्यात घेणे एवढेच त्यांचे काम आहे, अशा शब्दांत त्यांनी घणाघात केला. (Mamata Banerjee On BJP)

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) म्हणाल्या की, त्यांनी (BJP) महाराष्ट्रावर कब्जा केला. आता झारखंड ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पश्चिम बंगाल त्यांचा पराभव करेल. बंगालला तोडणे त्यांना शक्य नाही. कारण या ठिकाणी त्यांना आधी रॉयल बंगाल टायगरशी लढावं लागेल, असं आव्हानही ममता यांनी भाजपला दिलं.

भाजप (BJP) २०२४ मध्ये सत्तेत येणार नाही असा मला विश्वास आहे. भारतात ४० टक्के बेरोजगारी वाढतेय. मात्र, पश्चिम बंगालमध्ये ४५ टक्के कमी झाली आहे. आजच्या घडीला मीडिया ट्रायल सुरू आहे आणि ते लोकांनाच आरोपी करत आहेत. ते फक्त पश्चिम बंगालची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही ममता म्हणाल्या.

राज्य मंत्रिमंडळातील मंत्री पार्थ चटर्जी यांच्या अटकेबाबतही ममता बॅनर्जी यांनी भाष्य केले. कोणत्या एजन्सीच्या कामकाजामुळे त्रस्त नाही. पण त्यांचा वापर कोणत्याही राजकीय पक्षांच्या बदनामीसाठी केला जाऊ नये. आम्ही मीडिया ट्रायलच्या विरोधात आहोत, असं ममता यांनी ठणकावून सांगितलं.

दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने शाळांमध्ये नोकऱ्यांसंबधी कथित घोटाळा प्रकरणाच्या चौकशीत पार्थ चटर्जी यांना २३ जुलै रोजी अटक केली होती. संस्थेने त्यांच्या जवळच्या सहकारी अर्पिता मुखर्जी यांनाही अटक केली होती. ईडीने अर्पिता यांच्याशी संबधित ठिकाणांवरून २१ कोटी रुपयांची रोकड जप्त केल्याचा दावा केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT