BJP Leader Killing Saam tv
देश विदेश

BJP Leader Killing : भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या; परिसरात एकच खळबळ

BjP Leader Killing at west bengal : पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. भाजप नेत्याच्या हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

bjp Leader Shot dead in Bengal : पश्चिम बंगालच्या मथुरापूर जिल्ह्यात भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. ते मथुरापूरमधील भाजपचे सोशल मीडिया संयोजक होते. या भाजप नेत्याचं नाव पृथ्वीराज नस्कर आहे. भाजप नेते पृथ्वीराज यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे.

भाजप नेते पृथ्वीराज नस्कर यांच्या हत्येनंतर पक्षाने विविध सवाल उपस्थित केले आहेत. पक्षाच्या प्रवक्त्याने या हत्येमागे कोणाचा हात आहे? त्यांचा हेतू काय? असे सवाल उपस्थित केले आहेत. हत्येच्या घटनेनंतर भाजपने सरकार आणि पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. विरोधकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हल्ले केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सरकार आणि पोलीस प्रशासन पक्षपात करत असल्याची आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे.

बंगालमध्ये आतापर्यंत अनेक भाजप नेत्यांची हत्या झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत सातव्या टप्प्यादरम्यान मतदानानंतर एका भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कार्यकर्त्या त्याच्या चहाच्या दुकानात असताना त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या कार्यकर्त्याने काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि टीएमसी या दोन्ही पक्षात आरोप-प्रत्यारोप सुरुच असतात. पश्चिम बंगालमध्ये लवकरच ६ विधानसभा मतदारसंघाच पोटनिवडणूक होणार आहे. दरम्यान, मिथुन चक्रवर्तीच्या विधानाने बंगालमधील राजकीय वातावरण तापलं आहे. २७ ऑक्टोबर रोजी झालेल्या भाजपच्या एका बैठकीत मिथुनने सत्ता मिळवण्यासाठी काहीही करण्यास तयार असल्याचं वक्तव्य केलं होतं. मिथुनने अमित शहा यांच्या उपस्थितीत वक्तव्य केलं होतं.

'या भागात ७० टक्के मुस्लिम आहेत. तर ३० टक्के हिंदू आहेत. तुम्ही आम्हाला नदीत फेकाल तर एक दिवस आम्हीही तुम्हाला फेकू. आम्ही भागीरथी नदी फेकणार नाही. कारण भागीरथी नदी आमची आई आहे. आम्ही तुम्हाला दुसऱ्या जागेवर गाडून टाकू, असं वादग्रस्त विधान मिथुन चक्रवतीने केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalwan Exit Poll: कळवण मतदारसंघातून जे. पी. गावित होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Maharashtra Exit Poll: मेहकरमध्ये शिंदे गटाचे संजय रायमुलकर होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Assembly Election: निकालाआधीच महाविकास आघाडीमध्ये पडद्यामागं काही तरी घडतंय?

Jalgaon News : साप पकडणे बेतले जीवावर; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू

SCROLL FOR NEXT